वारकरी आतंकवादी आहेत का? इंग्रजांनाही जमले नाही, ते सरकारने करुन दाखविलं!    - Vishwa Hindu Parishad criticizes Thackeray government Ashadi Wari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

वारकरी आतंकवादी आहेत का? इंग्रजांनाही जमले नाही, ते सरकारने करुन दाखविलं!   

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

कोरोना काय फक्त वारक-यांमुळेच वाढतो का ? असा प्रश्न शंकर गायकर यांनी सरकारला विचारला आहे.

पिंपरी : ''पालखी सोहळ्यावर  Ashadi Wari निर्बंध घालण्याचे जे काम मुघल आणि इंग्रजांनाही जमले नाही, ते महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले आहे,'' अशी जळजळीत टीका विश्व हिंदू परिषदेचे  Vishwa Hindu Parishad  महाराष्ट्र, गोवा क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत केली. Vishwa Hindu Parishad criticizes Thackeray government Ashadi Wari

पालकमंत्र्यांचे मेळावे, लग्नसोहळे सुरु असताना सातशे वर्षांची वारीची परंपरा तेवढी खंडीत करुन सरकारने वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळत पंढरपुरात चंद्रभागेमध्ये फक्त स्नानाची मागणी वारकऱ्यांनी केली होती. पण, त्याला परवानगी देण्याऐवजी राज्य सरकार दडपशाही पध्दतीने जाचक नियम टाकून प्रतिबंध करीत आहे. कोरोना काय फक्त वारक-यांमुळेच वाढतो का ? असा प्रश्न गायकर यांनी विचारला. दुसरीकडे सरकारने रेल्वे, एसटी, बाजारपेठा सुरु ठेवायला परवानगी दिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांची नजर कैदेतून सन्मानाने सुटका करावी, वारकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मानाच्या पालखीसोबत दहा वारक-यांना कोरोनाचे नियम पाळून सहभागी होण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. त्याविषयी  जगजागृती करण्यासाठी उद्या(ता.१७) राज्यभर वारकरी आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मंदिरे व सरकारी कार्यालयासमोर प्रबोधन करतील. त्यानंतर उद्‌भवणा-या परिस्थितीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. 

मुख्यमंत्र्याना पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याचे वारकरी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष पांडूरंगशास्त्री शितोळे महाराज म्हणाले. २००६ला कराडमध्ये जाऊन बंडा तात्यांना उध्दव ठाकरे यांनी वारक-यांसाठी शिवसेना काहीही करायला तयार आहे, असे आश्वासन दिले होते. तेच ठाकरे आता मुख्यमंत्री असताना बंडा तात्यांना नजर कैदेत ठेवतात. ही राज्याची शोकांतिका आहे, असे ते म्हणाले. वारकरी आतंकवादी आहेत का ? अशी विचारणा त्यांनी केली. वारक-यांची श्रध्दा आणि भावनेला सरकार आळा घालत असेल तर वारकरी विद्रोह करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारलं ; भाजपसह वारकऱ्यांचा विरोध 
पंढरपूर : आषाढीचा सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा केला जाणार आहे. मानाच्या दहा पालख्यातील ४०० भाविकांना वारीसाठी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख