पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात आढळले अडीच हजार कोरोना रुग्ण 

पूर्वीच्या आदेशानुसार शाळा, कॉलेजस, क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंदच असतील.
पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात आढळले अडीच हजार कोरोना रुग्ण 
Two and a half thousand corona patients were found in a single day in Pimpri Chinchwad

पिंपरी : कोरोनाचा कहर पिंपरी चिंचवडमध्ये सुरूच असून शुक्रवारी (ता. २ एप्रिल) दोन हजार ४६३ रुग्ण आढळले, तर १९ बळी गेले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी शहरात दररोज दोन हजारावर हे नवे पेशंट मिळून आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या तीन दिवसांत सहा हजार ८६४ नव्या रुग्णांची भर पडली, तर ५४ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४४ हजार ७१४, तर बळींचा आकडा दोन हजार ३४ वर पोचला आहे. सध्या शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १९ हजार ६९० असून त्यातील तीन हजार ३९८ रुग्णालयात, तर १६ हजार २९२ घरीच उपचार घेत आहेत.

दरम्यान, कोरोनाचा कहर सुरुच राहिल्याने पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदीचा आदेश शुक्रवारी सायंकाळी जारी केला. त्याचा भंग करणाऱ्याला एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. तसेच, शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, नाट्यगृह, जिम, मॉल ९ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. या काळात सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवरही निर्बंध आहेत तर, पूर्वीच्या आदेशानुसार शाळा, कॉलेजस, क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंदच असतील.

 
पुणे जिल्ह्यात आज सायंकाळपासून सात दिवस संचारबंदी

पुणे : पुणे जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढते आहे. कोरोनाचा हा वाढता आलेख रोखण्यासाठी आजपासून (ता. ३) पासून सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा दरम्यान पुढील सात दिवस अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा जमावबंदी लागू राहणार आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जवळपास सर्वच बैठकीत लोकप्रतिनिधींनी लाॅकडाऊन नको पण कडक निर्बंध लागू करा अशी भूमिका घेतली. सुमारे चार तास ही बैठक सुरु होती. बैठकीनंतर हाॅटेल, बार, माॅल, चित्रपटगृहे पुढील दोन आठवडे पूर्ण बंद राहणार आहेत.  येत्या ३० एप्रिलपर्यंत राज्यातील शाळा काॅलेजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. 

राज्यात सर्वाधिक टेस्ट झाल्या आहेत. रुग्णसंख्या ८ हजारांवर पोचली आहे. रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांवर गेले आहे, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली. आरोग्य सुविधा वाढविण्यावर आमचा भर राहणार आहे. दोन्ही पालिकांना मायक्रो प्लॅनिंग करण्यास सांगण्यात आले आहे. काही हाॅस्पीटल शंभर टक्के कोरोना हाॅस्पीटल्स करावी लागतील, असेही त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येईल, असेही राव यांनी स्पष्ट केले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in