उपमहापौरांना शुभेच्छा द्यायला गेले आणि खिसा रिकामे करून आले 

गर्दीचा फायदा घेत पाकिटचोरही या दालनात शिरले.
Thieves stole money from the pockets of activists who came to congratulate the Deputy Mayor of Pimpri Chinchwad
Thieves stole money from the pockets of activists who came to congratulate the Deputy Mayor of Pimpri Chinchwad

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे नवनिर्वाचित उपमहापौर केशव घोळवे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला. तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपैकी एका कार्यकर्त्याने चोरट्याला रंगेहाथ पकडले. ही घटना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवनात घडली. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (ता. 6) होती. त्यामुळे महापालिका भवनात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. महापालिका सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी नवनिर्वाचित उपमहापौर केशव घोळवे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. गर्दीचा फायदा घेत पाकिटचोरही या दालनात शिरले. येथे जमलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या खिशावर त्यांनी डल्ला मारला. 

दरम्यान, एका कार्यकर्त्याच्या खिशात हात घालताना एकाने या दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे रक्कमही सापडली. याबाबत तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या पिंपरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. 

दरम्यान, या घटनेमुळे महापालिका भवनात खळबळ उडाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


हेही वाचा : चंद्रकांत पाटलांची बदनामी दोघांना पडली महागात 

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत फेसबुकवर बदनामीकारक आणि विडंबन करणारी छायाचित्रे पोस्ट केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा (एनसी) आज दाखल करण्यात आला. दरम्यान, अशा गुन्ह्यात न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास करता येत नसल्याने तो करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

आयुब जमादार आणि कीर्तीसिंह कोरेकर पाटील (पत्ता माहीत नाही) अशी या गुन्ह्यातील संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुब जमादार याने चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र क्रॉप करून आपल्या फेसबुक अकाउंटवरून बदनामीकारक मजकुरासह प्रसिद्ध केले. कोरेकर पाटील याने ते शेअर केले होते. तपासासाठी न्यायालयाची परवानगी मागितली असल्याचे तपास अधिकारी आणि निगडी पोलिस ठाण्याचे फौजदार पी. डी. आरदवाड यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com