भाजप नगरसेविकेचा बळी गेल्यानंतर पिंपरी पालिकेला आली खडबडून जाग  - Take immediate steps to prevent dengue and swine flu Mai Dhore | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नगरसेविकेचा बळी गेल्यानंतर पिंपरी पालिकेला आली खडबडून जाग 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्याच्या उपाययोजना तातडीने करा,असे  महापैारांनी सांगितले.

पिंपरी :  आपल्या पक्षाच्या नगरसेविकेचा डेंगीने बुधवारी (ता. १४) बळी गेल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप लगेचच खडबडून जागी झाली. डेंगीच नाही, तर डासामुळे होणारा मलेरिया तसेच स्वाईन फ्लू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे फर्मान महापौर माई ढोरे Mai Dhore यांनी काढले आहे. त्याबाबत दुर्लक्ष करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. immediate steps to prevent dengue and swine flu Mai Dhore

पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या अर्चना बारणे Archana Barne या तरुण नगरसेविकेचा डेंगीमुळे अकाली मृत्यू झाला. त्यानंतर काल तातडीने महापौरांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनात आरोग्य विभागाची बैठक घेऊन हा आदेश दिला. यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला असल्याची कबुली महापौरांनीच दिली.

डासांमुळे डेंग्यू, मलेरिया तसेच साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्याच्या उपाययोजना तातडीने करण्यास त्यांनी आरोग्य विभागाला बजावले. त्यात दुर्लक्ष व विलंब करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर  कडक कारवाई करण्याची सुचना त्यांनी आयुक्तांना केली. कोरोना कमी होत चालला असताना डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले, तर नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण होवू शकते, असे त्या म्हणाल्या. 

पालिकेच्या वतीने धुराडे फवारणी ( फॉगिंग ), औषध फवारणी, डबक्यांमध्ये ऑईल टाकणे, गप्पी मासे सोडणे, कोरडा दिवस पाळणे आदी उपाय योजना होताना दिसत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही बाब आरोग्य विभागाने लक्षात घेणे गरजेची असून याविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. वर्षा डांगे आदी या बैठकीला उपस्थित होते.    

कला दिग्दर्शक साप्ते आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक 
पिंपरीःकलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपी राकेश सत्यनारायण मौर्यासह (वय ४६,रा. कांदिवली पूर्व,मुंबई) आणखी एकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर, पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबईहून आलेल्या मौर्याला पोलिसांनी काल (ता.१५) पिंपरीत सापळा लावून पकडले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख