This step was taken by BJP after the criticism of NCP .jpg
This step was taken by BJP after the criticism of NCP .jpg

राष्ट्रवादीच्या टीकेनंतर भाजपने उचलले हे पाऊल 

टक्केवारी न मिळाल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदीचा विषय गेल्या आठवड्यात स्थायीनेमंजुर न केल्याचा आरोप विरोधी पक्ष राष्ट्रवादीने केला होता.

पिंपरी : कोरोनाचा शहरात विस्फोट झाल्याने आयुक्तांनी स्थायी समितीच्या मंजुरीची वाट न पाहता आपल्या अधिकारात व्हेंटिलेटर खरेदी करा, असे पत्रच स्थायी समिती अध्यक्ष अँड. नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे. 

टक्केवारी न मिळाल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदीचा विषय गेल्या आठवड्यात स्थायीने  मंजुर न केल्याचा आरोप विरोधी पक्ष राष्ट्रवादीने केला होता. त्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागलेल्या स्थायीने आता व्हेंटिलेटर खरेदी आयुक्तांनी आपल्या अधिकारात करण्यास सांगितले आहे. त्याला लांडगे यांनी दुजोरा दिला. तातडीची गरज असल्याने आमच्या मंजूरीची. वाट न पाहता व्हेंटिलेटर खरेदी करण्यास आयुक्तांना सांगितले आहे, असे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. 

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनीही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर वाढवा, अशी सूचना गटनेते व सर्व पक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत सोमवारी आयुक्तांना केली होती. वाढती रुग्ण संख्या पाहता व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी, रेमडेसिव्हिरची व्यवस्था करावी अशी मागणी लांडगे यांनी यावेळी केली.

या वेळी प्रशासनाच्या तयारीची माहिती आयुक्तांनी दिली. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांसाठी पुरेसा रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडची सुविधा वाढविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com