राज्य कोरोनात, तर सरकार कंगनात अडकले

नगरपालिकांना राज्य सरकार निधी देत नसल्याची खंत व्यक्त करत ज्या नगरपालिका कोविड विरोधात चांगले काम करत आहेत, त्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा.
The state is stuck in Korona, while the government is stuck in Kangana: Praveen Darekar
The state is stuck in Korona, while the government is stuck in Kangana: Praveen Darekar

लोणावळा : राज्यात कोरोना विषाणूचे संकट वाढत आहे. शहरांसह ग्रामीण भागात कोरोना वेगाने पसरत आहे. मात्र, राज्य सरकारला अजूनही जाग आलेली नाही. सरकार आपल्या विसंवादात आणि "कंगनात' अडकले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. 

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या कोविड महासर्वेक्षण अभियानाचा प्रारंभ प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, नगरसेवक देविदास कडू, बाळासाहेब जाधव, वृंदा गणात्रा, रचना सिनकर, मंदा सोनवणे आदी उपस्थित होते. 

राज्य सरकारला अजूनही कोविडला महत्व द्यावंसं वाटत नाही, जेवढं कंगनावर बोलतात, त्यातील चार वाक्‍य कोविडवर बोलली तरी जनतेला दिलासा मिळेल, असा टोला दरेकर यांनी शिवसेनेला लगावला. 

नगरपालिकांना राज्य सरकार निधी देत नसल्याची खंत व्यक्त करत ज्या नगरपालिका कोविड विरोधात चांगले काम करत आहेत, त्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली. 

येथील संजीवनी कोविड केअर सेंटरला भाजपच्या वतीने दरेकर यांच्या हस्ते व्हेंटिलेटर भेट देण्यात आला. महासर्वेक्षण अभियानास नगरपरिषदेने स्वतः पुढाकार घेतला असून सहाशे स्वयंसेवकांची फौज उभी केली आहे, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या. 

हेही वाचा : अण्णा बनसोडेंनी 41 लाख दिले; जगताप, लांडगेंनी किती निधी दिला? 


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरासाठी कोणी किती निधी आणला व दिला यावरून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात संदोपसुंदी सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर निधीवरून आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. 

गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात आले होते. त्यांनी अजित पवार यांच्यावर टिका केली होती. प्रत्युत्तरादाखल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पाटील यांच्यावर आरोप केले. त्याला भाजपच्या महापौर उषा ढोरे व महापालिका सभागृह नेते नामदेव ढाके यांनी उत्तर दिले. 

त्यानंतर राज्य सरकारने महापालिकेला सतराशे कोटी रुपये दिल्याचा दावा वाघेरे व शितोळे यांनी केला होता. मात्र, तो खंडित करीत ढोरे व ढाके यांनी अवघे दीड कोटी रुपये सरकारने दिल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. 

आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिकेला 41 लाख 50 हजार रुपये दिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही आमदारांनी किती निधी दिला, हे जाहीर करावे, असे आव्हान वाघेरे व शितोळे यांनी दिले आहे. राज्य सरकारने महापालिकेला 1700 कोटी रुपयांच्या खर्चासह दोन कोटी 15 लाख आणि खासगी बॅंकेच्या सीएसआर फंडातून 40 लाख रुपयांचा निधी दिल्याचा दावाही त्यांनी केला. 

महापौर उषा ढोरे आणि महापालिकेतील सभागृह नेते नामदेव ढाके यांनी आपले ज्ञान तपासून पहावे. शहरातील कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून द्यावेत. पिंपरी चिंचवड शहरात पाच हजार बेडची स्वतंत्र व्यवस्था करावी, कंपन्यांचे शेड तात्पुरत्या रुग्णालयांसाठी वापरण्यात यावे आणि केंद्र सरकारकडून जीएसटीचा परतावा निधी तातडीने आणावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजपच्या नेत्यांना करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com