दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराने पिंपरी-चिंचवड हादरले

दोन्ही बळी पडलेल्या मुली मजुरांच्या आहेत. त्याबाबत त्यांच्या आईने फिर्याद दिली आहे.
 Sexual abuse of two minor girls in Pimpri-Chinchwad .jpg
Sexual abuse of two minor girls in Pimpri-Chinchwad .jpg

पिंपरी : अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटनांची शनिवारी (ता.१८) पिपंरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) नोंद झाली. त्यामुळे पोलिस (Police) दलातच नाही, तर शहरातही खळबळ उडाली आहे. त्यातील भोसरीतील घटनेत आरोपीने पिडीत १५ वर्षीय मुलीला पट्याने मारहाण करीत तसेच तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यातून गर्भवती राहताच तिला आरोपीच्या बहिणीने दोन पपया आणि गोळ्या खायला घालून तिच्या गर्भपाताचा प्रयत्न केला. तर, चाकणच्या प्रकारात पिडीत १२ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला आहे. (Sexual abuse of two minor girls in Pimpri-Chinchwad) 

दरम्यान, दोन्ही घटनांत बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणच्या गुन्ह्यातील दोघांपैकी अक्षय पराजी खडे ( वय २०, रा. पानसरेवस्ती, ठाकरवाडी, कोळवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि.पुणे ) या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी लगेच आवळल्या आहेत. तो मजुरी करतो. त्याला २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती तपासाधिकारी पूनम जाधव यांनी दिली. तर, दुसरा आरोपी सुनिल मधे (रा. राक्षेवाडी, चाकण, ता. खेड) याचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

याबाबत प्रथम मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मात्र, तो चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निष्पन्न झाल्याने तो त्यांच्याकडे पाठवण्यात आला. तर, भोसरीच्या गुन्ह्यातील संशयित नराधम दत्तू बसप्पा पूजारी ( वय २२, रा.  शांतीनगर वसाहत, भोसरी) यालाही ताब्यात घेण्यात आले. असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक एम. एस. मोहरे यांनी दिली. या प्रकारात आरोपीला मदत करणारी त्याची बहिण गंगू (वय १९) ही फरार झाली, असून तिचा पोलिस शोध घेत आहेत.

दोन्ही बळी पडलेल्या मुली मजुरांच्या आहेत. त्याबाबत त्यांच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यातील चाकणची घटना डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान घडली. त्यात दोन्ही आरोपींनी वारंवार बलात्कार केल्याने पिडीत मुलगी गरोदर राहून तिने नुकताच बाळाला जन्म दिला आणि हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या आईने पोलिसात धाव घेतली. भोसरीच्या प्रकारात, तर १५ वर्षीय पिडीत मुलीला आरोपी दत्तूने बेल्टने मारहाण करून तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिली. हे पाहून दत्तूची बहिण गंगूने पिडीत मुलीला दोन पपया आणि औषधांच्या गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. म्हणून तिलाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com