पिंपरीच्या माजी उपमहापौरांवर फसवणूक, अपहार, चोरीचे सात गुन्हे 

त्यांचा रक्तदाब व साखर वाढल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Seva Vikas Bank Former chairman Amar Mulchandani has been remanded in police custody for four days
Seva Vikas Bank Former chairman Amar Mulchandani has been remanded in police custody for four days

पिंपरी : पोलिसांनी सोमवारी (ता. 8 मार्च) अटक केलेले पिंपरीतील सेवाविकास को ऑपरेटीव्ह बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमहापौर अमर मूलचंदांनी यांच्याविरुद्ध फसवणूक, अपहाराचे सहा, चोरीचा एक असे सात गुन्हे गेल्या तीन वर्षांत दाखल असल्याची माहिती पोलिसानी आज (मंगळवारी, ता. 9 मार्च) न्यायालयात दिली. त्यातीलच एका 19 कोटी रुपयांच्या बनावटगिरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक दाखवून पोलिसांनी मुलचंदांनींची 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाकडून मिळवली आहे. 

मुंबईत मालाड येथून मूलचंदानींना परवा रात्री पिंपरी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. वरील गुन्ह्यात सोमवारी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा रक्तदाब व साखर वाढल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज डिस्चार्च मिळताच सायंकाळी त्यांना पोलिसांनी पिंपरी न्यायालयात हजर केले. 

संशयित आरोपीचा राजकीय क्षेत्रात दबदबा आहे. तो जामीनावर सुटताच साक्षीदारांवर दबाव आणून तपासाला अडथळा आणेल. तसेच, पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करेल. हा गुन्हा गंभीर, क्‍लिष्ट असून त्याची व्याप्ती मोठी असल्याने पुढील तपास व पुरावे गोळा करण्यासाठी, त्यातील इतरांचा सहभाग शोधण्याकरिता संशयित आरोपीची 14 दिवसांची पोलिस कोठडी तपासाधिकारी व सरकारी वकिलांनी मागितली होती. त्याला आरोपीच्या तीन वकिलांनी विरोध केला. 

संशयित आरोपी सेवाविकास बॅंकेचे अध्यक्ष असताना त्यांच्याच वतीने बॅंकेच्या अधिकाऱ्याने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यात आरोपपत्रही सादर झाले आहे. तसेच, त्यात संशयित आरोपीचे नाव नाही. त्यांना राजकीय वैमनस्यातून गोवण्यात आल्याचा दावा आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. 

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा व त्यातील आरोप गंभीर असून तसेच आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही पोलिसांना तपास करता येत असल्याने न्यायालयीन कोठडी देण्याची आरोपींच्या वकिलांची विनंती न्यायालयाने अमान्य केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com