शिवसेनेच्या सभापतीला काळा बुरखा घालता; मग बनसोडेंच्या मुलाला का घातला नाही 

या विषयाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
Sanjay Raut is upset with the police over the no-confidence motion in Khed
Sanjay Raut is upset with the police over the no-confidence motion in Khed

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेडच्या अविश्वासाच्या प्रकरणात पोलिस यंत्रणा वापरली गेली असेल, तर चिंताजनक आणि गंभीर आहे. अज्ञाताने केलेल्या कथित गोळीबाराचा संदर्भ सभापती भगवान पोखरकर यांच्याशी जोडून, त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखा काळा बुरखा घालणे, परेडला उभे करणे अयोग्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाने गोळीबार केला. मग त्याला अटक करताना काळा बुरखा का घातला नाही? शिवसेनेच्या सभापतींना जशी वागणूक दिली, तशी बनसोडेंना का दिली नाही? कायदा सर्वांसाठी सारखा आहे. या विषयाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी पोलिस यंत्रणेबाबतही नाराजी व्यक्त केली. (Sanjay Raut is upset with the police over the no-confidence motion in Khed)

खेड तालुक्यातील शिवसेना-राष्ट्रवादीचा वाद राज्याच्या पातळीवर पोचला आहे. शिवसेनेचे खासदार राऊत यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. ते म्हणाले, खेड पंचायत समितीबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी आघाडीधर्म, राजकारणातील नीतिनियम, महाराष्ट्राची राजकीय परंपरा सोडून घाणेरडे आणि निर्घृण राजकारण केलेले आहे. याला सत्तेचा माज आला आहे, असे म्हणावे लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहित्यांचा बंदोबस्त करावा, त्यांना वेसण घालावी आणि ते त्यांचे ऐकत नसतील, तर शिवसेनेला मुभा द्यावी. आम्ही काय ते करू. वेळ पडल्यास हा विषय राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्यापर्यंत नेऊ, असेही ते म्हणाले.

'शिवसेनेने खेड पंचायत समितीचे विषय प्रतिष्ठेचा केलेला आहे. खेडचे आमदार आघाडीच्या नीतीनियमांना, माणुसकीला आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला अनुसरून वागलेले नाहीत. पंचायत समितीची इमारत इकडे किंवा तिकडे झाल्याने विशेष फरक पडणार नाही. मात्र एका स्वर्गवासी सहकारी आमदाराने मंजूर केलेली इमारत; ज्यामध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक आहे, ती आमदार होऊ देत नसतील, तर ते विरोधकांना बरोबर घेऊन काम करणार्‍या, शरद पवारांसारख्या नेत्याच्या पक्षात राजकारण करायच्या लायकीचे नाहीत'

खुनशीचे राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात आघाडीत सर्व काही व्यवस्थित चालू असताना, जर राष्ट्रवादीचा एखादा आमदार कुरघोडी करणार असेल, तर अजित पवार यांनी त्यांना वेसण घालावी. आम्ही संघर्ष टाळत आलो. वरच्या पातळीवर आघाडी धर्म पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. खेडच्याबाबतही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली होती. मात्र, खेडच्या आमदाराचा वारू कायमच उधळलेला असतो. पण शिवसेनेनेही बांगड्या भरलेल्या नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसेना कधीही लाचारी पत्करून सत्तेत सहभागी होत नाही. ज्या वेळी शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल, त्यावेळी आम्ही बंधने झुगारून लढा देऊ.  मोहिते यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटीवर पाय दिला आहे. मनात आणले तर खेडमध्ये काय ते दिसेल. 
 
फडणवीस-पवार भेटीबाबत राऊत म्हणाले

शरद पवार हे पक्षांपलीकडचे मोठे नेते आहेत. अनेकांना त्यांच्या सल्ल्याची गरज पडते. विरोधी पक्षनेत्यांचा त्यांच्याकडे राबता वाढत असेल, तर महाराष्ट्रातील सरकार अधिक स्थिर होत असल्याचे ते चिन्ह आहे, असे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या भेटीबाबत संजय राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com