स्थायीत डावललेल्या सचिन भोसलेंकडे शहरप्रमुखपदाची धुरा  

शिवसेना आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असून त्यासाठी पदाधिकारी नेमण्यास सुरवात केली आहे.
 Sachin Bhosle .jpg
Sachin Bhosle .jpg

पिंपरी : शिवसेना आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असून त्यासाठी पदाधिकारी नेमण्यास सुरवात केली आहे. गेल्या चार वर्षात विविध आंदोलन करून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सळो की पळो करून सोडणारे आणि स्थायी समिती सदस्य म्हणून डावललेले नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांना शहरप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. तर, विद्यमान शहरप्रमुख योगेश बाबर यांना जिल्हा (पिंपरी, भोसरी, चिंचवड) सहसंपर्कप्रमुख करून त्यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.

पालिकेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न असून त्यासाठी अधिकाधिक नगरसेवक निवडून आणणार असल्याची प्रतिक्रिया या निवडीनंतर अॅड. भोसले यांनी 'सरकारनामा'ला दिली. मी केलेल्या कामाची व आंदोलनाची पक्षाने दखल घेतली, असे ते म्हणाले.  पद वाढल्याने आता जबाबदारीही वाढली असल्याचे बाबर यांनी सांगितले. हे दोघेही शहराचे प्रतिनिधीत्व करणारे मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या निकटचे समजले जातात. शरद हुलावळे यांची उपजिल्हाप्रमुख (मावळ), तर बाळासाहेब फाटक यांची लोणावळा शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान, एका लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचा आतापर्यंत एकच जिल्हाप्रमुख होता. आता ते तीन-तीन केले गेले आहेत. त्यामुळे एका पुणे जिल्ह्यात शिवसेनचे नऊ जिल्हाप्रमुख झाले आहेत. त्यातून या पदाचे अवमूल्यन करण्यात आले असल्याची तिखट प्रतिक्रिया एका जिल्हाप्रमुखानेच नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 

पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील नियुक्त्या करताना पिंपरीत बारणे, तर जिल्ह्यात उपनेते व शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या समर्थकांचा विचार केला गेल्याचे दिसून येत आहे. सहसंपर्कप्रमुख म्हणून अशोक खांडेभराड यांच्याकडे खेड, शिरूर राजेंद्र काळे यांच्याकडे भोर, पूरंदर, बारामती, तर राम गावडेंकडे दौंड, इंदापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. 

नवे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे (जुन्नर आंबेगाव), माऊली कटके (शिरूर, खेड, आंबेगाव), विजय देशमुख (भोसरी, हडपसर), महेश पासलकर (दौंड, इंदापूर), रमेश कोंडे (बारामती, खडकवासला), बाळासाहेब चांदेरे (पुरंदर, भोर),गजानन चिंचवडे (मावळ, चिंचवड, भोसरी), गजानन थरकुडे (शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती), संजय मोरे (पुणे कॅन्टोमेंट, कसबा पेठ, वडगाव शेरी) हे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष सचिव व खासदार अनिल देसाई यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. 
 
Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com