श्रावण हर्डीकरांच्या बदलीची शक्यता...सहा अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमोशन.. - possibility of transfer of pimpri chinchwad commissioner shravan hardikar | Politics Marathi News - Sarkarnama

श्रावण हर्डीकरांच्या बदलीची शक्यता...सहा अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमोशन..

उत्तम कुटे
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीचेही वारे आता जोरात वाहू लागले आहेत.  

पिंपरी : अपर जिल्हाधिकारी दर्जाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीवर पुण्यात बदली झाली आहे. राज्यातील इतर सहा अपर जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रमोशन झाले आहे. दरम्यान, पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीचेही वारे आता जोरात वाहू लागले आहेत. त्यांचीही कधीही बदली होऊ शकते. 

अपर जिल्हाधिकारी (गट अ) संवर्गातील पाटील व इतर सहा अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या श्रेणीत बढती देण्यात आली आहे. पाटील यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (सामान्य) या पदावर झाली आहे.

त्याखेरीज भानूदास पालवे (अपर आय़ुक्त, नाशिक), अविनाश पाठक (अपर आय़ुक्त, औंरगाबाद), प्रवीणकुमार देवरे (उपआय़ुक्त, नाशिक), मिलिंद साळवे (उपायुक्त, महसूल, नागपूर), मकरंद देशमुख (उपायुक्त, कोकण, नवी मुंबई) आणि भारत बास्टेवाड (अध्यक्ष, जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, रायगड) या अपर  जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रमोशन झाले आहे.  

श्रावण हर्डीकर यांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यात शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या बदलीची मागणी त्यातून केली गेली आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीही तेच आहेत.

या स्मार्ट सिटीच्या कामात शहरात अंदाजे तीनशे कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवडमधील तीन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकताच केला आहे. त्याप्रकरणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचेही आदेश दिल्याने हर्डीकर यांची बदली होण्याची शक्यता वाढली आहे.

सर्वाधिक आरोप झालेले आणि त्यामुळे सर्वात जास्त वादग्रस्त ठरलेले हर्डीकर हे पहिलेच आयुक्त आहेत. सत्ताधाऱ्यांचे बाहूले, त्यांचा घरगडी असेही त्यांना हिणवण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख