लसीकरणासाठीची चिठ्ठी ही चमकोगिरी; मावळात राजकारण तापले पहा व्हिडीअो

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे या दोन्ही आजी, माजी आमदारांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करताना एकमेकांची नावे घेण्याचे खूबीने टाळले आहे.
लसीकरणासाठीची चिठ्ठी ही चमकोगिरी; मावळात राजकारण तापले पहा व्हिडीअो
Sunil Shelke, Bala Bhegade .jpg

पिंपरी : मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांची कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या शिफारशीची चिठ्ठी व्हायरल होताच लगेच मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे  (Bala Bhegade) यांनी शेळकेना लक्ष्य केल आहे. चमकोगिंरी न करता सर्व स्थानिक नागरिकांना लस देऊन त्यांना दिलासा द्यावा, असा टोलाही त्यांनी शेळकेंचे नाव न घेता लगावला. दरम्यान, यावरून लसीकरणाचे राजकारण  मावळात जोरात रंगल्याचे पहायला मिळत आहे. (politics of vaccination has started in maval taluka of pune district)

 माजी आमदार बाळाभाऊ आणि विद्यमान आमदार सुनीलअण्णा यांच्यात पंढरपूर-मंगळवेढ्यानंतर पुन्हा यानिमित्ताने सामना रंगला आहे. बाळाभाऊ हे सोलापूर जिल्ह्याचे भाजप प्रभारी तथा निरीक्षक असल्याने ते पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीसाठी तिकडे समाधान आवताडे या आपल्या उमेदवारासाठी १५ दिवस तळ ठोकून होते. तर, शेळके यांनीही दोन दिवस तिकडे जाऊन आपले उमेदवार भगीरथ भेलके यांचा जोशात प्रचार केला होता. २०१९ पर्यंत एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये असलेल्या या दोघा नेत्यांत लसीकरणानिमित पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, या नव्हे, तर इतरही अनेक ठिकाणी लसीकरणात राजकारण घुसले आहे. त्याबाबत शुक्रवारी पुणे येथे झालेल्या जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार ()यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे या दोन्ही आजी, माजी आमदारांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करताना एकमेकांची नावे घेण्याचे खूबीने टाळले आहे. तसेच आरोपबाजी करताना या दोघांनीही शिवराळ भाषा न वापरता एकमेकांचा आदराने उल्लेख करीत एकमेकांना शालजोडीतून दिले आहेत. शेळकेंच्या चिठ्ठीशिवाय लस (Vaccination) मिळत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच भेगडेंनी त्यावर हल्लाबोल केला. स्थानिक आमदार शिफारस करेल, त्यालाच लस मिळते. तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या इतरांना ती मिळत नाही, हे दुर्दैवी आहे, असे भेगडे म्हणाले.  ही चमकोगिरी न करता सर्व स्थानिकांना लस देऊन त्यांना दिलासा द्यावा, असे टोमणा त्यांनी मारला.

जीवावर उदार होऊन माझे कार्यकर्ते लोकांच्या सोईसाठी प्रशासनाला हे सहकार्य करीत असून ते पुढही चालूच राहील, असे आव्हानवजा प्रत्यूत्तर शेळकेंनी दिले आहे. त्याबाबत विरोधकांच्या टीकेची फिकीर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांना फक्त राजकारणच करायचंय, पण ही जागा आणि वेळही त्यासाठी नाही, असे ते म्हणाले. उलट त्यांनीही अशीच लसीकरण केंद्रावर जाऊन जनतेला मदत करावी, असा सल्ला त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना दिला आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in