कृष्णप्रकाश यांचा दणका : गुंडाला गोपनीय माहिती देणाऱ्या पोलिसाला दाखवला घरचा रस्ता 

या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Police suspend for providing confidential information to gangster
Police suspend for providing confidential information to gangster

पिंपरी : गुन्हेगाराला पोलिस ठाण्यातील गोपनीय माहिती पुरविणाऱ्या गुन्हे शाखेतील पोलिसाला पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, अवैध धंदे व गुन्हेगारांविरुद्ध आयुक्त कृष्णप्रकाश यांनी मोहीम उघडलेली असताना पोलिसच गुन्हेगाराला मदत करीत असल्याचे दिसून आले होते, त्यामुळे आयुक्तांनी त्यालाही दणका दिला आहे. (Police suspended for providing confidential information to a gangster)

लक्ष्मण नावजी आढारी असे निलंबित पोलिस शिपायाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनीट चारमध्ये नेमणुकीस होता. त्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय गोविंद पाटील याला खेड तालुक्यातील चाकण पोलिस ठाण्यातील गोपनीय माहिती पुरवली आहे. चाकण पोलिस ठाण्यातील अत्यंत गोपनीय असे मोबाईल सिडीआर रेकॉर्ड आढारी याने पाटील याला देऊन मदत केली होती. त्याबद्दल आढारी याच्यावर आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे.


हेही वाचा : आमदारपुत्राला अटक करावी लागली नाही, तर केली : कृष्णप्रकाश

पिंपरी : कायद्यासमोर सर्व समान असतात. त्यानुसार जो कोणी दोषी असतो, त्याच्याविरुद्ध कारवाई होते. तेच मी केले. असे सांगत सत्ताधारी असूनही  राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाविरुद्ध झालेल्या कारवाईमागील खुलासा पिंपरी चिंचवडचे (Pimpri-Chinchwad)आर्यनमॅन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या खास मुलाखतीत केला. तसेच आमदारपुत्र सिद्धार्थ याला अटक करावी लागली नाही, तर केली. असे सांगत ही कारवाई नाईलाजाने नाही, तर कायद्याने झाल्याचे त्यांनी सूचित केले. 
 
हेही वाचा  ः भाजपचे मोठे मासे राष्ट्रवादीच्या गळाला; लवकरच पक्षप्रवेश

दरम्यान, आरोपी व फिर्यादी अशा दोन्ही बाजू विचारात घेऊन सखोल व निष्पक्ष तपास केल्यानेच आमदार बनसोडेंच्या कार्यालयात यावर्षी १२ मे रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात सत्ताधारी आमदारांच्या मुलाविरुद्ध केवळ गुन्हाच नोंद झाला, नाही तर त्यात त्याला अटकही झाल्याचे आयुक्तांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. प्रथम आमदारांनीच आपल्या दिशेने गोळीबार झाल्याचे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणात त्यांचा मुलगाच दोषी असल्याचे आढळल्याने व त्यात त्याला नंतर अटकही झाल्याने या घटनेत मोठा ट्विस्ट आला. परिणामी त्याची राज्यभर चर्चा झाली होती.

सत्ताधारी आमदाराच्या मुलाची केस असल्याने ती बंदही करता आली असती वा झाली असती. मग तुम्ही हे नाजूक आणि राजकीय दबावाचे प्रकरण कसे हाताळलेत असे विचारले असता सर्वात तंदुरुस्त आयपीएस असलेले कृष्णप्रकाश यांनी कायद्यासमोर सगळे समान असतात, मग दोषी कोणीही का असेना. असे सांगत या प्रकरणी निष्पक्ष कारवाई झाल्याचेच सांगितले. कधीकधी आरोपीच पोलिस कारवाईपासून स्वताला वाचण्यासाठी बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो, हे सांगताना त्यांनी ताजे उदाहरण दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com