पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्यास पकडले 

पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यासपन्नास हजार रुपयांची लाच घेताना आज पकडण्यात आले.
पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्यास पकडले 
Police arrested the officer while accepting a bribe of Rs 50,000 .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यास सचिन कुबेर जाधव (वय ३७) याला पन्नास हजार रुपयांची लाच घेताना आज पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. त्याबाबत जाधव कर्तव्यास असेल्या वाकड पोलिस ठाण्यातच त्याच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशीरा पर्यंत सुरु होते. 

या प्रकरणातील तक्रारदाराकडून जाधव याने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर एक लाखावर तडजोड झाली. त्यातील पन्नास हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना त्याला पकडण्यात आले. सदर तक्रारदार व त्याच्या कुटुंबाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात त्यांनी अटकपूर्व जामीनही घेतला होता. तरीही अटकेची प्रक्रिया करून जामीनावर सोडण्यासाठी आणि लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याकरिता जाधव याने ही लाच मागितली होती.

पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयात लाचखोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. यापूर्वी सांगवी पोलिस ठाण्यातील एका सहाय्यक फौजदाराने, तर वीस हजार रुपयांची लाच पोलिस ठाण्यातच २२ डिसेंबरला घेतली होती. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे एका दिवाणी प्रकरणातील ताबा वॉरंटची अंमलबजावणी करण्याकरिता या एएसआयने पन्नास हजार रुपये मागून वीस हजारावर तडजोड केली होती. 

त्याअगोदर चार दिवस पिंपरी कॅम्पात एका महिला वाहतूक पोलिसाने नो एंट्रीत घुसलेल्या महिला दुचाकीस्वाराकडून  मोठ्या हुषारीने लाच घेतली होती. लाचेची रक्कम या महिला पोलिसाने आपल्या पॅन्टच्या मागील खिशात या महिला दुचाकीस्वाराला ठेवण्यास सांगितली होती. मात्र, ती घेतानाचा व्हिडिओ एका जागरूक स्थानिक नागरिकाने चित्रित करून तो व्हायरल केल्याने ही लाचखोरी उजेडात आली होती. 

Edited By - Amol Jaybhaye  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in