फक्त चपलेवरून पोलिसांनी लावला १५ लाखाच्या चोरीचा छडा  - Police arrested the accused for breaking into an ATM and stealing Rs 15 lakh-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

फक्त चपलेवरून पोलिसांनी लावला १५ लाखाच्या चोरीचा छडा 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 जुलै 2021

चाकणमधील एटीएममध्ये मध्यरात्रीनंतर दीड वाजता स्फोट घडवून आणून लाखो रुपये लुटण्यात आले होते.

पिंपरी : सेवाविकास को ऑपरेटीव्ह बॅंकेत (Seva Vikas Co-operative Bank) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या गुन्ह्यात बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी तुरुंगात आहेत. या बॅंकेचा कॅशियर व शिपायाला १५ लाख रुपयांचा गंडा आपल्याच बॅंकेला घातल्याबद्दल शनिवारी (ता.२४) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी अटक केली. आपल्या बॅंकेच्या एटीएमची बनावट चावी व पासवर्ड तडीपार गुंडाला ही चोरी त्यांनी केली होती. सीसीटीव्हीत कैद झालेल्या आरोपीच्या चपलेवरून माग काढत पोलिसांनी काही तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. (Police arrested the accused for breaking into an ATM and stealing Rs 15 lakh) 

दरम्यान, आयईडीसारख्या उच्च दर्जाच्या स्फोटकाव्दारे चाकण एमआयडीसीत भांबोली येथील एटीएममध्ये स्फोट घडवून त्यातील अंदाजे तीस लाख रुपयांची लूट नुकतीच (ता. २०) करणारे लुटारू हे मध्यप्रदेशातील असल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयात प्रथमच एटीएम फोडून नाही, तर त्यात स्फोट करून ही लुट झाली होती. त्यात परप्रांतीय गुन्हेगार असल्याचा संशय 'सरकारनामा'ने दुसऱ्या दिवशी (ता.२१) व्हायरल केलेल्या बातमीत व्यक्त केला होता. तो अचूक निघाला.

हेही वाचा : आई-बाबांचा चेहार दिसेल म्हणून दोन दिवसांपासून वाट पाहतोय...

हा गुन्हा उघड होण्याच्या आत लगेच तीन दिवसांत शनिवारी (ता.२४) पुन्हा लाखो रुपयांची चोरी एटीएममध्येच भोसरीत होऊन त्यात १५ लाख ४२ हजार सातशे रुपये एटीएम न फोडताच चोरीस गेल्याने पोलिस चक्रावून गेले होते. मात्र, कसलाही पुरावा नेसताना करण्यात आलेली ही लूट सीसीटीव्हीत कैद झालेल्या एका आरोपीच्या चपलेवरून माग काढून पोलिसांनी काही तासांत उघडकीस आणल्याने पोलिस आय़ुक्तांनी पत्रकारपरिषद घेऊन ही कामगिरी केलेल्या आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. 

चाकणमधील एटीएममध्ये मध्यरात्रीनंतर दीड वाजता स्फोट घडवून आणून लाखो रुपये लुटण्यात आले होते. त्या स्फोटाने जागा झालेल्या एका स्थानिकाला दोघांपैकी एका चोरट्याने गोळी घालण्याची भीती दाखवली होती. नेमका तसाच प्रकार शनिवारी भोसरीतील एटीएम चोरीतही घडला. ही चोरीही बरोबर रात्री दीड वाजताच झाली. तेथेही चोरांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला त्यांनी हातोड्याने धमकावले होते. एटीएममध्ये सीसीटीव्ही व अलार्म न लावणे तसेच तेथे सुरक्षारक्षक न ठेवून रिझर्व बॅंकेच्या एटीएमसंदर्भातील सुरक्षेच्या उपाययोजनांचे गाईडलाईनचे उल्लंघन केल्याने अज्ञात आरोपीसह सेवाविकास बॅंकेलाही पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केले होते. 

पहिल्या एटीएमची चोरी उघडकीस येण्याअगोदरच दुसऱ्या एटीएममधूनही लाखो रुपयांची लूट झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतले. कारण त्यावरून टीका होण्याची शक्यता होती. मात्र, चोरट्याने काहीच पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र, एटीएमची तोडफोड न करता ही चोरी झाल्याने त्यात बॅंकेच्या काही लोकांचा हात असल्याचा संशय त्यांना आला होता. म्हणून त्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु केली. त्यात रोहित महादेव गुंडाळ या शिपायाच्या मोबाईलमध्ये एका फोटोतील दोघांनी घातलेली चपल खटकली. कारण, दरम्यानच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फूटेज तपासले होते. त्यात दुचाकीवरून आलेल्या दोन लुटारुंपैकी एकाने घातलेली चपल आणि शिपायाच्या मोबाईलमधील फोटोतील दोघांची चपल सारखीच आढळली. त्यावरून त्यांनी शिपायाची चौकशी केली. 

हेही वाचा : तो भीषण आवाज येकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...

पोलिसी पद्धतीने त्याच्याकडे चौकशी करताच त्याने आनंद चंद्रकांत मोरे व रोहित रोकडे या मित्रांचे ते फोटो असल्याचे सांगितले. त्यातील मोरेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच आपल्या वाट्याला आलेले दोन लाख सत्तर हजार रुपयेही काढून दिले. गुंडाळ व बॅंकेचा कॅशियर रोहित काटे यांनी आपल्याला भोसरीतील त्यांच्या एटीएमची चावीच नाही, तर पासवर्डही दिला. त्याबदल्यात चोरीच्या रकमेतील निम्मी देण्याची अट घातली होती, असे मोरेने पोलिसांना सांगितले. त्यावरून गुंडाळ व काटेची गठडी पोलिसांनी वळली. त्यात काटेच्या चौकशीत, तर धक्कादायक माहिती समजली. त्याने बॅंकेचे दहा लाख ८० हजार रुपये जमा न करता त्याचा अपहार गेल्या वर्षभरात केला होता. 

दरम्यान, या गुन्ह्यातील चौथा आरोपी व तडीपार गुंड सचिन शिवाजी सुर्वे याला गुन्हे शाखा दोनने पकडले. त्याच्याकडून लुटीचे ८७ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. त्याने व मोरेने ही लूट केली होती. युनीट दोनचे पीआय शैलेश गायकवाड आणि  भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे व त्यांच्या पथकाने यांनी संयुक्तपणे काही तासांत हा गुन्हा उघडकीस आणला. 

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख