पहिल्याच भेटीत गृहमंत्री वळसे पाटलांच्या पोलिसांना कानपिचक्या

उद्योगनगरीतील गुन्हेगारी वाढली असल्याला गृहमंत्र्यांच्याच सांगण्यातून दुजोरा मिळाला आहे.
Plan immediate measures to curb rising crime in Pimpri : Home Minister Walse Patil
Plan immediate measures to curb rising crime in Pimpri : Home Minister Walse Patil

पिंपरी  ः पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करा, असा आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना शनिवारी (ता. १७ जुलै) दिला. गुन्हेगारी कमी झाली पाहिजे असे कान टोचत त्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करा, असेही त्यांनी बजावले. यातून उद्योगनगरीतील गुन्हेगारी वाढली असल्याला गृहमंत्र्यांच्याच सांगण्यातून दुजोरा मिळाला आहे. (Plan immediate measures to curb rising crime in Pimpri : Home Minister Walse Patil)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी (ता. १७ जुलै) दिल्लीत झालेली बहुचर्चित भेट ही संसदेचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच होते तशी झाली असावी, असा अंदाज वळसे-पाटलांनी पोलिस पिंपरी पोलिस आयुक्तालय पाहणी व आढाव्यानंतर बोलताना व्यक्त केला. नवे कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, सहकार आणि बॅंकिग प्रश्न यावरही या भेटीत चर्चा झाली असावी, असे ते म्हणाले. 

हेही वाचा : ईडी, सीबीआयला ओवेसी बंधूंची संपत्ती दिसत नाही का?

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या आजच्या पाहणीच्या वेळी राज्यात नवीन काही कारागृह उभारण्याची मागणी झाली असून त्यावर विचार करून सरकार निर्णय घेईल. कोरोनामुळे राज्यातील कारागृहामधील गर्दी कमी करण्यासाठी कैदी सोडण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गृहमंत्री झाल्यानंतर वळसे पाटील हे प्रथमच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यांनी येथील गुन्हेगारी व पोलिसांच्या प्रश्नांचा आढावा घेतला. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडेही त्यांच्यासोबत होते. त्यांना पोलिस आयुक्तालयाच्या आवारात मानवंदना देण्यात आली. 

ता. १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्थापन झालेले पिंपरी पोलिस आयुक्तालय सध्या महापालिकेने दिलेल्या भाड्याच्या जागेत आहे. ते स्वतःच्या मालकीच्या अद्ययावत इमारतीत जाण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ता. १६ जुलै रोजी चिखली येथील चार हेक्टर (अंदाजे दहा एकर) जागा पोलिस आयुक्तालयासाठी देण्याची सूचना पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शहराचे पोलिस आयुक्तालय चिखलीत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. 

राज्यात पाच हजार दोनशे पोलिसांच्या होऊ घातलेल्या भरतीतील १५ टक्के म्हणजे ७२० पोलिस हे पिंपरी आयुक्तालयाला दिले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पोलिस व नागरिकांतील सुसंवाद वाढावा, यासाठी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याने महिन्यातून एकदा जनता दरबार भरवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी या वेळी दिले. सामान्य जनतेला दिलासा वाटण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रयत्न केले पाहिजेत, या कडक शब्दांत मृदू स्वभावाच्या वळसे पाटलांनी पोलिस दलाचे कान टोचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com