पिंपरी, मावळातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी आसाम निवडणुकीच्या प्रचारात

पिंपरी चिंचवड, मावळ युवक काँग्रेसचे पदाधिकारी सध्या आसामच्याप्रचारात सहभागी झालेले आहेत.
पिंपरी, मावळातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी आसाम निवडणुकीच्या प्रचारात
sate27.jpg

पिंपरी : आसाममधील विधानसभा निवडणूकीसाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पिंपरी-चिंचवडकर पृथ्वीराज साठे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांना आसामचे सहप्रभारी नेमण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला पिंपरी चिंचवड, मावळ युवक काँग्रेसचे पदाधिकारी सध्या प्रचारात सहभागी झालेले आहेत.

साठे हे गेल्या दोन महिन्यापासून आसामात तळ ठोकून आहेत. त्यांच्या मदतीला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर काँग्रेसचे पदाधिकारी होते. तर, दुसऱ्या टप्यातील निवडणूक प्रचारात मावळ व पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे पदाधिकारी २२ तारखेपासून सामील झालेले आहेत. त्यांना निवडणूक निरिक्षक म्हणून तेथे पाठवण्यात आले आहे. ते साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. पिंपरी चिचंवड युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा उपाध्यक्ष सौरभ शिंदे, तळेगाव शहर (ता. मावळ) अध्यक्ष विशाल वाळुंज व शरद कदम यांचा त्यात समावेश आहे. 

आसामच्या ग्वालपाडा व ठूबरी या जिल्ह्यातील ग्वालपाडा पूर्व, ग्वालपाडा पश्चिम, दूधनोई, जलेश्वर, साऊथ सालामारा, गोलकगंज या  मतदारसंघात प्रचार आघाडी यंत्रणा, प्रत्यक्ष नागरी बैठका, बूथ व्यवस्थापन, सामाजिक समन्वय तसेच शहरी व ग्रामीण मतदारांशी समन्वय साधण्याचे काम ते करीत आहेत.

याबाबत सरकारनामाशी बोलताना बनसोडे म्हणाले, काँग्रेससोबत ए.आय.यु.डी.एफ, सीपीएम, सीपीआय, बीपीएफ, या महाआघाडीकडून सत्तापरिवर्तनाचा संकल्प करण्यात आला आहे. पक्षाचा नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध असून महिलांना दोन हजार रुपये मासिक निधी, २०० युनिट मोफत वीज, चहा बागांतील कामगारांना ३६५ रुपये दैनिक वेतन व सुमारे ५ लक्ष रोजगार सरकारी क्षेत्रात देण्याचे आश्वासन पक्षाने जाहीरनाम्यात दिले आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in