आपल्याच बॅंकेला गंडा घालणारा माजी नगरसेवक, अध्यक्ष तसेच सीईओला अटक

पिंपरी-चिंचवडमधील (विशालनगर,पिंपळे निलख) श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बॅंकेचा अध्यक्ष असलेल्या माजी नगरसेवकाला व बँकेच्या सीईओला पोलिसांनी बॅंकेतील अडीच कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. अध्यक्षाला वीस तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
आपल्याच बॅंकेला गंडा घालणारा माजी नगरसेवक, अध्यक्ष तसेच सीईओला अटक
Pimpri Police Arrested Ex Corporator in Fraud Case

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील (विशालनगर,पिंपळे निलख) श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बॅंकेचा अध्यक्ष असलेल्या माजी नगरसेवकाला व बँकेच्या सीईओला पोलिसांनी बॅंकेतील अडीच कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. अध्यक्षाला वीस तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

विलास एकनाथ नांदगुडे असे सांगवी पोलिसांनी अटक केलेल्या या सहकारी बॅंकेच्या अध्यक्षाचे, तर देवेंद्र मोहन बारटक्के असे मुख्य कार्यकारी अधिकाऱी तथा सीईओचे नाव असल्याचे सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सरकारनामाला सांगितले. हे दोघे व इतर सातजणांविरुद्ध ता. १५ रोजी फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा नोंद झाला होता. अशा व्हाईट कॉलर क्राईममध्ये सहसा लगेचच अटकेची कारवाई होत नाही. मात्र, हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून मुख्य दोन आरोपींना  काही तासांत अटक केली. 

नांदगुडे हे २००२ ला अपक्ष म्हणून निवडून आले होते. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. पण,तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून उभे राहिले.निवडून आल्यावर पुन्हा राष्ट्रवादीशी संलग्न झाले.त्यामुळे, नंतर त्यांना स्थायी समिती अध्यक्ष  करण्यात आले होते. २००७ ला त्यांच्या पत्नी सुजाता या राष्ट्रवादीकडून नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.२००९ ला ते विधानसभा लढले आणि तेथून त्यांच्या राजकीय प्रवासाला ओहोटी लागली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) ते संचालकही राहिले आहेत 

इतर आरोपींत आणखी एक सीईओ,तीन महिला बॅंक अधिकारी आणि चार कर्जदार आहेत. रविंद्र सोनवणे (सीईओ), गायत्री देशपांडे (अधिकारी),हेमलता नांदगुडे आणि स्मिता कदम (दोघीही कॅशिअर),ज्ञानदेव खेडकर, रामलिंग केदारी,तेजस जाधव आणि जगन्नाथ पाटील (चौघेही कर्जदार) असे इतर इतर आऱोपी आहेत. या सर्वांनी मिळून कटकारस्थान करून खोट्या कागदपत्रांव्दारे बॅंक कर्ज आणि ठेवींमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याबाबत भगवान बोत्रे (रा.देहूगाव) यांनी फिर्याद दिलेली आहे. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ दरम्यान हा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in