पिंपरी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामण बारणे यांचे कोरोनाने निधन 

थेरगावच्या उपसरपंचपदापासून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली होती.
पिंपरी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामण बारणे यांचे कोरोनाने निधन 
Sarkarnama Banner - 2021-07-31T153648.015.jpg

पिंपरी : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे मोठे बंधू आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामण बारणे (वय ७०, रा. थेरगाव) यांचे कोरोनामुळे शनिवारी (ता. ३१ ) निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे यांचे ते वडील होत. 

दुपारी पावणे बाराच्या सुमारास पुण्यातील एका खासगी रुग्णालयात बारणेंनी अखेरचा श्वास घेतला. अर्धांगवायूवरील उपचारासाठी १५  दिवसांपूर्वी ते निपाणीला गेले होते. येताना कोल्हापूरला मुक्काम केला होता. परत येताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 

थेरगावच्या उपसरपंचपदापासून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली होती. महापालिकेच्या स्थापनेनंतर १९८६ च्या पहिल्या निवडणुकीत थेरगावमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९८८-८९ मध्ये त्यांनी स्थायीचे अध्यक्षपद भूषविले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. 

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासह विविध पदांवर त्यांनी काम केले. थेरगावसारख्या अविकसित भागात त्यांनी मोठे काम केले. पाणीयोजना, रस्ते, वीज अशी कामे केली. प्राधिकरणग्रस्त थेरगाव भागात त्यांनी सर्वाधिक विकासकामे केली. 

डॉ. अभिनव देशमुखांचा शिरुर पोलिसांना दणका
शिरूर  : अवैध धंदे व विशेषतः बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई न करता त्यांच्याकडूनच पैशांची वसुली केल्याप्रकरणी शिरूर पोलिस Shirur Police ठाण्यातील एका पोलिसाला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख Dr. Abhinav Deshmukh यांनी निलंबित केले आहे. दोघा पोलिसांची तडकाफडकी मुख्यालयात बदली केली आहे.  इब्राहिम गनी शेख, असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव आहे.  बदली केलेल्या पोलिसांची नावे जाहीर केलेली नाहीत.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in