मोठा निर्णय : पिंपरी चिंचवड महापालिकाही देणार नागरिकांना मोफत कोरोना लस

महाविकास आघाडी सरकारवर भाजप सत्ताधारी असलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचा भरवसा नाय का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation will provide free corona vaccine to the citizens
Pimpri Chinchwad Municipal Corporation will provide free corona vaccine to the citizens

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (ता. २८ एप्रिल) जाहीर केला आहे. दुसरीकडे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने सुद्धा आजच शहरातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा विषय मंजूर केला आहे. त्यातून महाविकास आघाडी सरकारवर भाजप सत्ताधारी असलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचा भरवसा नाय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील १८ ते ४५ वयोगटातील तरुणाईच्या मोफत लसीकरणासाठी महापालिकेला शंभर कोटी रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी पालिका प्रशासनाने स्वतंत्रपणे लस उत्पादक कंपन्यांशी संपर्क करुन थेट पद्धतीने लस खरेदीची तयारी करण्याचा विषय स्थायी समितीने आज मंजूर केला आहे. सद्यस्थितीत या लसीचा पुरवठा सुरळीत नसल्याने बहुतांश लसीकरण केंद्र महापालिकेला बंद ठेवावी लागली आहेत. त्यामुळे १८ वर्षावरील मोठ्या टप्यासाठी सरकारवर अवलंबून न राहण्याचे पिंपरी पालिकेने ठरवले आहे. पण, केंद्र सरकारने ही लस राज्याला मोफत दिली व ती राज्य सरकारकडून वेळेत मिळाली, तर मात्र आम्ही ती खरेदी करणार नाही, असे स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड नितीन लांडगे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले

महानगरपालिका हद्दीतील १८ ते ४५ वर्ष वयोगटातील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे व माजी शहराध्यक्ष ज्येष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांनी सूचना केली होती. मोफत लस दिल्यास जास्तीत जास्त नागरीक ती घेतील व कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. म्हणून सर्वांना मोफत लस देण्याचा विषय मंजूर करण्यात आला, असे अॅड. नितीन लांडगे यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यातील ५३९ फौजदारांना ‘एपीआय’पदाची लॉटरी


पिंपरी : राज्यातील ५३९ फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) आज पदोन्नती मिळून सहायक पोलिस निरीक्षक तथा एपीआय झाले आहेत. कोरोना महामारीच्या निराशाजनक गर्तेत ही आशादायक बातमी राज्य सरकारने देऊन एकप्रकारे या संकटाचा मुकाबला करणाऱ्या पोलिस दलाचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. 

राज्य पोलिस दलातील नियमित बदल्या आणि बढत्यांना सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत नुकतेच सहायक पोलिस (एसीपी) तथा पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज (ता. २८ एप्रिल) खुल्या प्रवर्गातील पीएसआयच्या बढतीवर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवड शहराला ११ नवे एपीआय मिळाले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील १० फौजदार एपीआय झाले आहेत. त्यातील नऊ जणांची शहराबाहेर बदली झाली असून दोघांना पदोन्नतीवर शहरातच ठेवण्यात आले आहे.

पदोन्नती मिळालेले अधिकांश फौजदार मुंबई पोलिस दलातील आहेत. तेथील अनेक अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात गडचिरोलीला पाठवण्यात आले आहे, तर दुय्यम म्हणजे साईड ब्रँचला असलेल्यांना फिल्ड पोस्टिंग दिली गेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com