पुण्यानंतर आता पिंपरी पालिकेतही रहिवासी, ठेकेदारांना नो एंट्री

पालिकेची सर्वसाधारण सभाही ऑनलाईन होणार का, याकडे नो एंट्री केलेल्या रहिवाशांचे लक्ष लागलेले आहे.
पुण्यानंतर आता पिंपरी पालिकेतही रहिवासी, ठेकेदारांना नो एंट्री
Sarkarnama Banner (2).jpg

पिंपरी : कोरोनाचा शहरात प्रकोप झाल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आता आपल्या मुख्यालयासह सर्वच क्षेत्रीय कार्यालयात नागरिक आणि ठेकेदारांना आजपासून नो एंट्री केली आहे. त्यामुळे दररोज गजबजलेल्य़ा महापालिकेत आज सकाळपासून वर्दळ मंदावली गेली.

पुणे पालिकेने काल सकाळी असा आदेश काढल्यानंतर त्याचा कित्ता गिरवत पिंपरी पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी तो काल रात्री उशीरा आदेश जारी केला. कोरोनाचे निर्बंध प्रथम पुणे पालिका काढते व त्यानंतर पिंपरीपालिका तो आदेश काढते, ,असा गेल्या वर्षभराचा अनुभव आहे.

दरम्यान, स्मार्ट शहराकडे वाटचाल सुरु केलेल्या उद्योगनगरीला कोरोनाला नाईलाजाने का  होईना डिजीटल होण्यास भाग पाडले आहे. मात्र, प्रत्यक्ष भेटूनही तक्रारीचे निवारण अनेकदा होत नसल्याने ऑनलाईन तक्रारीचे काय होणार अशी शंका नागरिकांना भेडसावते आहे. दरम्यान,आयुक्तांसह इतर अधिकारी,क्षेत्रीय व विभागीय अशा ५१ कार्यालयांचे ई मेल जारी केले गेले आहेत. पण, नागरिकांना त्यावर संपर्क करण्यासाठी स्वतःचा मेल आयडी व त्याजोडीने इंटरनेट व त्याला रेंजही असावी लागणार आहे. 

पालिकेचा मोठा भाग ग्रामीण असल्याने तेथे वीज व नेटची समस्या आहे. विभागीय करसंकलन कार्यालये, मात्र सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा तसेच नगरसेवक आणि पदाधिकारी यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. दरम्यान,स्थायीच्या कामात रस असलेल्या ठेकेदारांना सबंधितांशी आता व्हाटसअप,मेल वा मोबाईल फोनवरच संपर्क साधावा लागणार आहे. मात्र, स्थायीसह पालिकेची सर्वसाधारण सभाही ऑनलाईन होणार का, प्रशासन ती तशी घेणार का याकडे नो एंट्री केलेल्या रहिवाशांचे लक्ष लागलेले आहे. कारण असा प्रयोग तेवढा यशस्वी न झाल्याचा अनुभव जमेस आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in