पक्षाच्या आमदारांच्या निलंबनाचा पिंपरी-चिंचवड भाजपकडून निषेध - Pimpri-Chinchwad BJP protests against suspension of party MLAs | Politics Marathi News - Sarkarnama

पक्षाच्या आमदारांच्या निलंबनाचा पिंपरी-चिंचवड भाजपकडून निषेध

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जुलै 2021

नंतर महाविकास आघाडी सरकारचा निषेध करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. याचवेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे हे मुंबईत विधानभवन आवारात तेथील आंदोलनात सामील झाले होते.

पिंपरीः राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना (MLA) एक वर्षासाठी केले गेलेले निलंबन हा लोकशाहीचा खून आहे, अशी घोषणाबाजी करीत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या वतीने मंगळवारी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर सोशल डिस्टंस न राखता निदर्शने करण्यात आली. (Pimpri-Chinchwad BJP protests against suspension of party MLAs)

नंतर महाविकास आघाडी सरकारचा निषेध करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. याचवेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे हे मुंबईत विधानभवन आवारात तेथील आंदोलनात सामील झाले होते. 

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर आघाडी सरकार सपशेल तोंडावर आपटले आहे. काल (ता. ५ ) सुरु झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात खोटी कारणे देऊन  भाजपच्या आमदारांचे निलंबनाव्दारे  लोकशाहीला काळीमा फासला आहे. मराठा आरक्षण व इतर मागास वर्गीय समाजाच्या आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी सुरु असलेल्या चर्चे मध्ये बोलू न देता आवाजी मतदानाने ठराव समंत करून घेतला. ही बाब लोकशाहीला धरुन नाही.अशी टीका या निवेदनात करण्यात आली आहे. 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे प्रदेश चिटणीस अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस अनुप मोरे, चिटणीस आशा काळे, पश्चिम महाराष्ट्र ओबीसी संपर्क प्रमुख वीणा सोनवलकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यात सद्यस्थितीत दुबार पेरणीचे संकट, MPSC परीक्षा पास विदयार्थी आत्महत्या, नोकरभरती, करोना महामारी असे अनेक गंभीर विषय असतानाही दोनच दिवसात अधिवेशन गुंडाळले.शेतकरी, विद्यार्थी, महिला सुरक्षा, महावितरण समस्या, लघु उद्योजकांच्या विविध अडचणी, कामेगार वर्ग, आशा स्वयंसेविकांचे प्रश्न यासह पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकारणामुळे पिंपरी- चिंचवडकरांवर झालेला अन्याय आदी कोणत्याच प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार चर्चा करायला तयार नाही, असे हे पदाधिकारी यावेळी म्हणाले.
 

हेही वाचा..

भाजप आमदार लाड यांच्याकडून 110 कोटींचा घोटाळा

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख