क्रिकेटमध्ये भारत हरला... पण पिंपरी-चिंचवड पोलिस जिंकले...  - Pimpri Chinchwa Police Cricket Caught international betting team | Politics Marathi News - Sarkarnama

क्रिकेटमध्ये भारत हरला... पण पिंपरी-चिंचवड पोलिस जिंकले... 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मार्च 2021

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वन डे मॅचवर बेटिंग घेणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडली.  

पिंपरी : धावांचा पाऊस पडलेल्या कालच्या (ता. २६) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या  (एमसीए) गहूंजे (ता. मावळ) येथील दुसऱ्या एकदिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारत हरला असला तरी, पिंपरी-चिंचवड पोलिस, मात्र जिंकले आहेत. त्यांनी या वन डे मॅचवर बेटिंग घेणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडली. त्यांच्याकडून तब्बल ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात विदेशी चलनही आहे. 

या कारवाईदरम्यान आरोपी बुकींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ३३ जणांच्या या टोळीत एक पोर्तुगाल देशाचा नागरिक आहे. तर, बाकीच्यांत गोवा आणि उत्तरप्रदेशातील प्रत्येकी एक, राज्यस्थान दोन, महाराष्ट्र ११ आणि हरियाणातील १३ जण आहेत. एकाच नाही, तर तीन ठिकाणाहून ही टोळी बेटिंग घेत होती. त्यातील एक ठिकाण हे गहूंजे स्टेडियमसमोरील टेकडी, तर दुसरे त्याबाजूची बहूमजली इमारतीत, तिसरे हे पुण्यातील लेमन ट्री हॉटेल होते, असे माहिती पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. 

या टोळीकडून ७४ मोबाईल फोन, आठ कॅमेरे, चार मोठ्या क्षमतेच्या दुर्बिणी, एक आलिशान मोटार, विदेशी चलनाचा समावेश असलेली दीड लाखाची रोकड असा ४५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर व त्यांच्या तीन टीमने ही कारवाई केली. पिंपरी-चिंचवडमध्ये झिलो टॉलरन्सचे धोरण असून असा कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पुन्हा एकदा कृष्णप्रकाश यांनी यानिमित्ताने दिला आहे.

हेही वाचा : पिंपरी, मावळातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी आसाम  निवडणुकीच्या प्रचारात
पिंपरी : आसाममधील विधानसभा निवडणूकीसाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पिंपरी-चिंचवडकर पृथ्वीराज साठे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांना आसामचे सहप्रभारी नेमण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला पिंपरी चिंचवड, मावळ युवक काँग्रेसचे पदाधिकारी सध्या प्रचारात सहभागी झालेले आहेत.साठे हे गेल्या दोन महिन्यापासून आसामात तळ ठोकून आहेत. त्यांच्या मदतीला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर काँग्रेसचे पदाधिकारी होते. तर, दुसऱ्या टप्यातील निवडणूक प्रचारात मावळ व पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे पदाधिकारी २२ तारखेपासून सामील झालेले आहेत. त्यांना निवडणूक निरिक्षक म्हणून तेथे पाठवण्यात आले आहे. ते साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत.  

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख