पिंपरी चिंचवड महापालिकाही लशीसाठी जागतिक टेंडर का़ढणार

त्यानंतरही पुरेशी लस मिळेल की नाही, याविषयी साशंकताच आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकाही लशीसाठी जागतिक टेंडर का़ढणार
PCMC HAS DECIDED TO GLOBAL TENDER FOR COVID VACCINE

पिंपरी  ः  जागतिक निविदा (टेंडर) काढूनही कोरोना लस मिळण्याची शक्यता कमी असल्याचे केंद्र सरकारच्या कोवि़ड-१९ च्या तज्ज्ञ गटाने सांगूनही पिंपरी महापालिका (PCMC) हे ग्लोबल टेंडर (GLOBAL TENDER) काढणार आहे. त्याव्दारे थेट लस उत्पादक कंपनीकडून ती खरेदी करणार असल्याचे महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे (MAYOR USHA DHORE) यांनी आज (ता. १५ मे) सांगितले. यानिमित्ताने हा निर्णय अगोदर घेतलेली शिवसेना सत्ताधारी असलेली बृहन्मुंबई महापालिका आणि भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी पालिकेचे सूर मात्र लस खरेदीत जुळले आहेत. (PCMC HAS DECIDED TO GLOBAL TENDER FOR COVID VACCINE)

जागतिक टेंडर काढले म्हणजे लस मिळेल, हा समज चुकीचा आहे. कारण, जगात कुठेही मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नाही. त्यात लस उत्पादक कंपन्यांनी अगोदरच अनेक देशांशी लस पुरवठ्याचे करार केल्याने त्यांचे हात बांधले गेल्याचे राष्ट्रीय कोरोना तज्ज गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटले आहे. तरीही मुंबईनंतर श्रीमंत पिंपरी पालिकेनेही त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यानंतरही पुरेशी लस मिळेल की नाही, याविषयी साशंकताच आहे.

पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुक्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्याकरिता प्रत्येक नागरिकाला पिंपरी पालिका ही लस दिली देणार आहे. त्यासाठी जागतिक निविदा काढणार असल्याचे महापौर ढोरे म्हणाल्या. त्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड नितीन लांडगे यांना आज केली. 

ग्लोबल टेंडर काढण्यामागील कारणमिमांसा करताना त्या म्हणाल्या की, सध्या पिंपरी चिंचवड शहराला कोरोना लसीचा सरकारकडून अत्यंत अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांच्या लसीकरणास बराच कालावधी लागू शकतो. त्यातही सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले आहे. शहरात याच वयोगटातील लोकसंख्या अधिक आहे, त्यामुळे पुरेशा लसीची तातडीची गरज आहे. 

पिंपरी चिंचवड शहरासाठीच्या कोट्यातून शहराबाहेरील नागरिकच नोंदणी करून ती घेत आहेत. त्यामुळे लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसल्याने शहरातील नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागते आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in