भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, उलट राष्ट्रवादीचेच भाजपमध्ये येतील

शहरातील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र, असे काही होणार नसून, राष्ट्रवादीचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत.
भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, उलट राष्ट्रवादीचेच भाजपमध्ये येतील
Amol Thorat .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे १५-२० नगरसेवक स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचा राष्ट्रवादीचा दावा भाजपने आज खोडून काढला. कोणीही पक्ष सोडण्याच्या विचारात नसून विरोधक केवळ अफवा पसरवीत आहेत, असे भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी सांगितले. उलट राष्ट्रवादीचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड भाजप म्हणजे एक मोठे कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पदाची अपेक्षा असते. पद एक असते आणि इच्छुक अनेकजण असतात. पद मिळाले नाही, म्हणून नाराजी असू शकते. पण, कोणताही नगरसेवक पक्ष सोडण्याचा विचार करीत नाहीत.

विरोधक केवळ अफवा पसरवीत आहेत, असा दावा थोरात यांनी केला. ते म्हणाले, शहरातील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र, असे काही होणार नसून, राष्ट्रवादीचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. 

शहरातील राष्ट्रवादीच्या गलथान कारभाराला कंटाळून जनतेने आमच्या बाजूने कौल दिला. महापालिकेत राष्ट्रवादीला पराभूत करून आम्ही सत्तेत आले. जनतेची ही नाळ अद्यापही कायम टिकून आहे. मात्र, उदासीन झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरविण्याचे काम चालू आहे. भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचीही अफवा पसरवली जात आहे. मात्र, ती खोटी आहे.

राष्ट्रवादीकडून गेल्या ५ तारखेला देखील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा मुहूर्त काढला होता. पण, तसे झाले नाही. भविष्यातही होणार नाही. भाजपचे नगरसेवक पक्षातच राहून जोमाने काम करतील. येणाऱ्या काळात उलट राष्ट्रवादीचेच नगरसेवक भाजपमध्ये येतील.

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in