सांगली नव्हे..सांगवी पँटर्न..पालिका खजिनाच्या चाव्या लांडगेंकडेच..

भाजप आमदार महेश लांडगे समर्थक नितीन लांडगे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
सांगली नव्हे..सांगवी पँटर्न..पालिका खजिनाच्या चाव्या लांडगेंकडेच..
ml5.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सांगली पँटर्न, नाही, तर स्थानिक सांगवी पँटर्न चालला. त्यामुळे भाजपचे अँड. नितीन लांडगे यांचा पाच मतांनी (दहा विरुद्ध पाच) दणदणीत विजयी झाला.

भाजपमधील नाराजीमुळे पिंपरीत सांगली पँटर्नची पुनरावृत्ती होण्याची चर्चा होती. पण, ती चर्चाच राहिली. आगामी निवडणुकीनिमित्त फक्त राष्ट्रवादीने वातावरण निर्मिती करुन घेतली. शहराचे कारभारी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थायीतील सह समर्थक सदस्यांनी साथ दिल्याने दुसरे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे समर्थक नितीन लांडगे यांचा दणदणीत विजय झाला. 

स्थायी अध्यक्षपदी संधी न मिळाल्याने स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले भाजपचे भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे हे मतदानासाठी आले नाही. त्यामुळे १६ पैकी १५ जणांनी मतदान केले. त्यात भाजपच्या नऊच्या बळाला अपक्ष आघाडीच्या एका सदस्याची साथ मिळाली. तर. विरोधी उमेदवार राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांच्या पारड्यात त्यांच्या पक्षाची चार व शिवसेनेचे एक अशी पाच मते पडली. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांच्या अँटी चेंबरमध्ये येऊन निवड बिनविरोध करण्याची विनंती केली होती. 

भाऊ हे सांगवीत राहतात. तो त्यांचा बालेकिल्ला आहे. स्थायीतील काही सदस्यही त्या भागातील त्यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी भोसरीला म्हणजे दादा समर्थक लांडगेंना भरभरून साथ व मते दिल्याने पिंपरीत सांगली नाही, तर स्थानिक सांगवी पँटर्न चालल्याची चर्चा या निवडणुकीनंतर पालिकेत होती. यानिमित्ताने सलग दुसऱ्यां पालिका खजिन्याची चावी महेश लाडगेंच्या भोसरीत राहिली आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in