राज्यात ५५ आमदारांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर ५० नगरसेवकांवर महापौर का होणार नाही?

येथे शिवसेना हाच ओरीजनल पक्ष असल्याचे सांगत त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीला चिमटा काढला.
The next mayor of Pimpri Chinchwad will be from Shiv Sena : Sanjay Raut
The next mayor of Pimpri Chinchwad will be from Shiv Sena : Sanjay Raut

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकीत शिवसेना मोठा आकडा लावणार असून ५० नगरसेवक निवडून आणत शिवसेनेचाच महापौर करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. ९ जुलै) पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना सांगितले. राज्यात ५५ आमदार असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, तसा ५० नगरसेवकांच्या जोरावर पिंपरीतही शिवसेनेचा महापौर होऊ शकतो, असे ते म्हणाले. (The next mayor of Pimpri Chinchwad will be from Shiv Sena : Sanjay Raut)

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी योग्यवेळी आघाडी करु. पण ती सन्मानाने पाहिजे, तरच चर्चा करु, असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राऊत यांनी या वेळी सांगितले. पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये निम्मे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आता ते परत राष्ट्रवादीत जातील. त्यामुळे येथे शिवसेना हाच ओरीजनल पक्ष असल्याचे सांगत त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीला चिमटा काढला. पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी आमदारांसह त्यांचे प्रमुख पदाधिकारी हे ठेकेदारीत गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला. पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


राज्यात इतरत्र शिवसेनेचे महापौर आहेत. फक्त पिंपरीत नाही. त्यामुळे येथेही शिवसेनेचा महापौर करण्याचा निर्धार केला असून तो आम्ही बसवणारच, असे राऊत म्हणाले. भय व भ्रष्टाचारमुक्त पिंपरी-चिंचवड या मुद्यावरच पालिका निवडणूक शिवसेना लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. भय आणि भ्रष्टाचारमुक्त असा नारा देऊन भाजप शहरात सत्तेत आली. पण, गेल्या साडेचार वर्षांत त्यांच्या राजवटीत भय व भ्रष्टाचार शहरात वाढल्याचा दावाही त्यांनी केला. 

स्मार्ट सिटीतील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचा आर्थिक घोटाळा राज्य सरकारकडे पोचला असून कोरोनाचे संकट आटोक्यात आल्याने त्याची आता चौकशी करू, असेही त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीतील गैरव्यवहाराची कागदपत्रे ईडीला दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. पिंपरी पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त कारभार म्हणजे ठेकेदारांची साखळी असून त्यात सत्ताधारी आमदार व पालिकेतील पदाधिकारी सामील असल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com