दोन पाटलांच्या सांगण्यावरुन राज्यात आंदोलनाचा धुरळा! 

राज्यात दोन्ही आंदोलने पाटलांच्या आदेशानुसारच होत आहेत.
दोन पाटलांच्या सांगण्यावरुन राज्यात आंदोलनाचा धुरळा! 
Chandrakant Patil, Jayant Patil .jpg

पिंपरी : कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या देशवासियांना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून आणखी संकटाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्राने केले आहे. आता खतांचीही दरवाढ करून त्यांनी शेतक-यांचेही कंबरडे मोडले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp)पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आज महागाईच्या निषेधार्थ आदोलनात केली. (NCP's agitation against inflation)

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी हे आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आदेशानुसार भाजपनेही यापुढील मराठा आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय आजच जाहीर केला. म्हणजे भाजपची उडी वा आंदोलन हे केंद्राच्या समर्थनार्थ ( कारण मराठा आरक्षणाला (Maratha reservation) केंद्राने फेरविचार याचिकेव्दारे आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे ) आहे. तर, राष्ट्रवादीची निदर्शने तथा आंदोलन हे केंद्राच्या विरोधात आहे. परंतू, ती दोन्ही पाटलांच्या आदेशानुसारच आहेत.

आजच्या राष्ट्रवादीच्या आंदोलनात पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक अंतर पाळले गेल्याचे दिसले नाही. कोरोना संकटात केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता असताना त्यांनी इंधन व गॅस दरवाढ करून जनतेला आणखी संकटात लोटण्याचे काम केल्याचे वाघेरे यांनी यावेळी सांगितले. तसेच खतांच्याही किमती सातशे रुपयांनी वाढविल्या. हे दरवाढीचे पाप कमी करण्याची मागणी आहे, असे ते म्हणाले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in