मुलाला पद देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत नगरसेवकाला दिला न्याय..

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी यश साने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
sane20.jpg
sane20.jpg

पिंपरी : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी यश साने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पक्षाचे धडाडीचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे चिरंजीव आहेत. कोरोनामुळे दत्ता साने यांचे निधन झाले.

यापूर्वी सुनील गव्हाणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष होते. त्यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती मिळाल्याने हे पद रिक्त झाले होते. शहर कार्यकारिणी केल्याशिवाय काम करता येणार नसल्याने प्रथम ती करून शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष नेमल्यानंतर कामाला धडाक्यात सुरवात करणार असल्याचे य़शने आज सरकारनामाला सांगितले. दरम्यान, यशची नियुक्ती ही दत्ताकाकांच्या कामाची पावती असून पक्षाने त्यांच्या कामाला न्याय दिल्याची भावना या नियुक्तीनंतर शहरात आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९च्या विधानसभा निवडणुकीचा मुख्य पाया आहे, असे सांगत त्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील, असं काम आपल्याला करायचं आहे, असे पाटील यांनी यावेळी नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांबरोबरच महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात आपली संघटना असायला हवी, असे ते म्हणाले. तर, राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांनी राजकारणापेक्षा समजाकार्यावर भर देण्याचे आवाहन केले. 

प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना हे पद कायमस्वरूपी नाही, जो काम करेल त्याला पदावर राहता येईल, एकदा काम करणं थांबलं की पद राहणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून प्रत्यकाने समाजाप्रती काम केले पाहिजे, असे त्यांनी बजावले. आमदार अमोल मिटकरी, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, याचबरोबर विद्यार्थी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम, संध्या सोनवणे, प्रशांत कदम, किरण शिखरे, चिन्मय गाढे, अविनाश चव्हाण, आशिष आवळे, विद्यार्थी काँग्रेसचे माहिती अध्यक्ष जितेश सरडे आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com