नद्यांना मोदींचे नाव द्या, त्या स्वच्छ होतील...राष्ट्रवादीचा टोला... 

पर्यावरण अहवाल हा कॉपीपेस्ट असल्याची टीका शहर राष्ट्रवादी पदवीधर संघाने केली आहे.
नद्यांना मोदींचे नाव द्या, त्या स्वच्छ होतील...राष्ट्रवादीचा टोला... 
pcmc6.jpg

पिंपरी : गटारगंगा झालेल्या शहरातील नद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिले, तर त्या सत्ताधारी भाजप लगेचच स्वच्छ करतील, अशी खोचक मागणी पालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पालिकेने यावर्षी सादर केलेला गेल्यावर्षीचा पर्यावरण अहवाल हा कॉपीपेस्ट असल्याची टीका शहर राष्ट्रवादी पदवीधर संघाने केली आहे. 

शहरातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून गेल्या चार वर्षात काहीही उपाययोजना झाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील यांनी केला आहे. नदीप्रदूषणाची ही व्यथा त्यांनी नवे आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर मांडली. 

नदीतील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नद्यांना गटारगंगेचे स्वरूप आले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे निदान नरेंद्र मोदींचे नाव नद्यांना दिले, तर नावासाठी का होईना काहीतरी काम होईल असे सांगत तशा मागणीचे निवेदनच त्यांनी आयुक्तांना दिले. यावेळी पर्यावरण अहवालावरही सुद्धा चर्चा झाली. कालबाह्य झालेल्या माहितीचा मारा फक्त त्यात करण्यात आला आहे. उपाययोजना काय केल्या वा करण्यात येत आहेत, त्याविषयी अवाक्षरही त्यात नाही. या दुर्बोध अहवालातून काहीही बोध होत नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा : पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे पायउतार झाले.. 
 
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी यांनी पाच महिन्यांतच आपल्या पदाचा राजीनामा आज दिला. या पदावर शहराचे कारभारी आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक वसंत बोराटे यांची नियुक्ती होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सांगली पॅटर्न, नाही, तर स्थानिक सांगवी पॅटर्न चालला. त्यामुळे भाजपचे अॅड. नितीन लांडगे यांचा पाच मतांनी (दहा विरुद्ध पाच) दणदणीत विजयी झाला. भाजपमधील नाराजीमुळे पिंपरीत सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चर्चा होती. पण, ती चर्चाच राहिली. आगामी निवडणुकीनिमित्त फक्त राष्ट्रवादीने वातावरण निर्मिती करुन घेतली. 

शहराचे कारभारी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थायीतील सह समर्थक सदस्यांनी साथ दिल्याने दुसरे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे समर्थक नितीन लांडगे यांचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर उपमहापौरपदीही याच मतदारसंघातील नगरसेवकाला संधी मिळणार आहे. त्यांना तसा शब्द देण्यात आलेला आहे. गेल्या चार वर्षांत त्यांना एकाही मोठ्या पदावर संधी देण्यात आलेली नव्हती. 

घोळवे यांनी आज संध्याकाळी दिलेला राजीनामा लगेच महापौर माई ढोरे यांनी मंजूर करून तो पुढे आयुक्तांकडे पाठवूनही दिला. मात्र,स्थायी अध्यक्षपदासाठी डावलल्याने काल स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले भोसरीतीलच रवी लांडगे यांचा राजीनामा, मात्र त्यांनी अद्याप मंजूर केलेला नाही.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in