आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या शैलेश मोहितेवर कडक कारवाई; अमोल कोल्हेंचे सूतोवाच
MP Amol Kolhe .jpg

आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या शैलेश मोहितेवर कडक कारवाई; अमोल कोल्हेंचे सूतोवाच

युवकचे राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते हे पोलिस तपासात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,

पिंपरी : खेड-आळंदीचे पक्षाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना हनीट्रँपमध्ये अडकवण्याच्या गुन्ह्यातील आरोपी आणि पक्षाचे युवकचे राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते हे पोलिस तपासात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये व्यक्त केले.

यावेळी  कोल्हे म्हणाले असे राजकारण आणि क्रृती कधीही खपवून घेतली जाऊ नये, त्यांच्या या वक्तव्यामुळे शैलेश मोहितेची गच्छंती अटळ समजली जात आहे. 

केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरण धोरणात घोळ असून त्यात ताळमेळ नसल्याने महाराष्ट्राला मागणीनुसार या लसीचा पुरवठा होत नसल्याचा हल्लाबोल कोल्हे यांनी केला. केंद्राच्या या लसीकरण धोरणात बोट ठेवायला जागा असल्याचे सांगत ती सदोष असल्याचा ठपका कोल्हेंनी ठेवला.त्यामुळे राज्याला १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांना लसीकरणासाठी ही लस कितपत उपलब्ध होईल, यावर त्यांनी साशंकता व्यक्त केली.

आज सकाळी त्यांनी पिंपरी चिंचवड पालिकेच्या ऑटो क्लस्टर जम्बो कोविड सेंटर आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम जम्बो हॉस्पिटलला भेट दिली. नंतर पालिका मुख्यालयात कोविड आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. केंद्राचे लसीकरण धोरण दुर्दैवी असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

हे ही वाचा

संतापजनक : पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये बेड मिळवून देण्यासाठी घेतले एक लाख रुपये
 
पिंपरी : मोफत आयसीयू बेडसाठी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये उकळल्याचा वैद्यकीय पेशातील कट प्रॅक्टिसचा धक्कादायक प्रकार पिंपरी महानगरपालिकेच्या ऑटोक्लस्टर कोवीड सेंटरमध्ये घडला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे बेडसाठी वेटिंग असल्याचे या सेंटरमध्ये सर्वसामान्यांना सांगितले जात होते. मात्र, खासगी रुग्णालयातील रुग्णांना पैसे घेऊन बेड दिला जात होता.

संतापजनक बाब म्हणजे हे सेंटर व ते चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलशी अर्थपूर्ण संबध असलेल्या पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे संतापजनक प्रकरण उघडकीस आल्यानंतर तडजोडीचा प्रयत्न सुरु केल्याचे समजले आहे. कोरोना झालेल्या पालिका शाळेतील मुख्याध्यापिकेच्या नातेवाईकांकडून हे पैसे घेण्यात आले. त्यांचा विद्यार्थी असलेले भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्यामुळे हा भंडाफोड झाला. त्यांना भाजपचे दुसरे नगरसेवक विकास डोळस यांची मदत झाली. 

त्यांनी हे पैसे घेणारा या सेंटरचा व त्यांच्याकडे पेशंट पाठवणारा वाल्हेकरवाडीच्या खासगी रुग्णालयाचा अशा दोन्ही डॉक्टरांना प्रसाद दिला. त्यानंतर कमिशनसाठी या सेंटरमध्ये सदर रुग्ण पाठविलेल्या वाल्हेकरवाडीतील खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरने आपला गुन्हा कबूल केला. एक लाखातील वीस हजार रुपये ठेवून ऐंशी हजार रुपये सेंटरच्या डॉक्टरांना दिल्याचे त्याने कबूल केले. ते गायकवाड यांनी चित्रित केले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in