बेड, रेमडेसिविरचा काळाबाजार कराल तर खळ्ळखट्याक ठरलेलाच 

बेड असूनही तो न देणार नसाल व रेमडेसिविरचा काळाबाजार करणार असाल, तर शंभर टक्के फुटणार, असा इशारा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज शहरातील रुग्णालये व काळाबाजार करणार्यांना दिला.
 MNS criticizes growing corona patients in Pipanri-Chichwad  .jpg
MNS criticizes growing corona patients in Pipanri-Chichwad .jpg

पिंपरी : बेड असूनही तो न देणार नसाल व रेमडेसिविरचा काळाबाजार करणार असाल, तर शंभर टक्के फुटणार, असा इशारा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज शहरातील रुग्णालये व काळाबाजार करणार्यांना दिला. शहरात सध्या कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने व तो झाला, तर रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने त्रस्त आहे. त्यामुळे मनसेने आत आपले खळ्ळखट्याक हे जालीम अस्त्र बाहेर काढले आहे.

'लवकरच खळ्ळखट्याक' अशी पोस्ट फेसबुकवर टाकत मनसेचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष आणि नगरसेवक सचिन चिखले यांनी हा इशारा दिला. शहर अजून जळताना पाहू शकत नाही, असे सांगत त्यासाठी वेळ आली, तर कायदा हातात घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र, राज्य व पिंपरी पालिकेत सत्तेत बसलेल्या तिघांचा यासंदर्भात कसा खेळ चाललाय हे तुम्ही पाहताय. पण, मी व माझा मनसैनिक तो पाहू शकत नाही.

असे नमूद करुन त्यातून कोरोनावरुन या तिघांत सुरु असलेल्या राजकारणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर खळ्ळखट्याक करणार असल्याचे मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले. त्याजोडीने शहरातील आमचे पदाधिकारी सुद्धा या गैरप्रकारांकडे लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रेमडेसिविरची निर्यात थांबवण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. तर, काल राज्य सरकारनेही हे औषध पुरवण्याची जबाबदारी रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयावर टाकली आहे. त्यामुळे त्यानंतर मनसेने रेमडेसिविरच्या काळाबाजारवाल्यांना दिलेला हा इशारा म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. दुसरीकडे कोरोनाचा विस्फोटच झाल्याने सरकारी व खासगी अशी दोन्ही रुग्णालये फूल झाली आहेत. त्यावर युध्दपातळीवर बेड वाढवणे हा उपाय आहे. त्याचा पाठपुरावा खरे,तर सर्वच राजकीय पक्षांनी करणे अत्यावश्यक आहे. दुसरीकडे कोरोनाचे दोन हजार १७७ नवे रुग्ण शहरात आढळले, तर तीसजणांचा बळी गेला. 

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com