कट्टर विरोधक सुनील शेळके आणि बाळा भेगडे आले एकाच व्यासपीठावर

या प्रश्नी शेळके यांनी अशी बैठक घेण्याची विनंतीवजा मागणी भेगडे यांना केली होती.
MLA Sunil Shelke and Bala Bhegade came on the same platform on the issue of fee concession
MLA Sunil Shelke and Bala Bhegade came on the same platform on the issue of fee concession

पिंपरी : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये ३५ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे कोरोना महामारीने आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक शुल्कात सूट देणारा मावळ हा राज्यातील हा पहिलाच तालुका ठरला आहे. विद्यार्थी फी सवलतीचा हा मावळ पॅटर्न राज्यात आदर्श पायंडा पाडणारा ठरला आहे. (MLA Sunil Shelke and Bala Bhegade came on the same platform on the issue of fee concession)

मावळ पॅटर्नसाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके व त्यांचे कट्टर विरोधक भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे सोमवारी (ता. २१ जून) मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी तालुक्यातील शैक्षणिक सस्थाचालकांच्या बोलावलेल्या बैठकीनिमित्त एकाच व्यासपीठावर आले होते.  त्यातच हा फी सवलतीचा निर्णय झाला. या प्रश्नी शेळके यांनी अशी बैठक घेण्याची विनंतीवजा मागणी भेगडे यांना केली होती. ती त्यांनी त्वरेने मान्य करीत तहसीलदारांना ती बैठक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ती झाली. 

बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शेळके,भेगडे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत राक्षे, संस्थाचालका चंद्रकांत शेटे, संतोष खांडगे, प्रकाश ओसवाल, गणेश खांडगे, संदीप काकडे, किशोर राजेश यांच्यासह पालक सदस्य अरुण माने, जमीर नालबंद,निरंजन सावंत, सुबोध जाजू, अतुल चौधरी,अरुण वाघमारे, अर्चना दाभाडे आदी या वेळी उपस्थित होते. 

शासनाच्या आदेशानुसार ट्यूशन फी व्यतिरिक्त अवांतर कोणतेही शुल्क शाळांना आकारता येणार नाही. तसेच, नवीन फीवाढ करता येणार नाही, असे तहसीलदारांनी प्रारंभीच स्पष्ट केले. तर, बैठकीत चालू शैक्षणिक वर्षात (२०२१-२२) फीमध्ये पन्नास टक्के सवलतीची जोरदार मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली. त्याला संस्थाचालक तयार नव्हते. त्यांनी २५ टक्क्यांपेक्षा जास्त सूट देण्यास असमर्थता व्यक्त केली. आमदार शेळके यांनी तीस टक्के सवलत देण्याची विनंती केली. तसेच, स्वतः पाच टक्के फीचा बोजा उचलण्याची तयारी दाखवली. त्यांची मागणी संस्थाचालकांनी मान्य केली. अशा प्रकारे ३५ टक्के सवलत पालकांना देण्याचा सामुदायिक निर्णय घेण्यात आला. शेळकेंचा वाटा हा अंदाजे पावणेदोन कोटी रुपयांचा असेल.  

मावळ तालुक्यातील एकूण १४ हजार विद्यार्थ्यांना सव्वाबारा कोटी रुपयांची ही सवलत मिळणार आहे. हा पॅटर्न व त्यातही मावळातील पॉलिटिक्स विथ रिसपेक्ट हा राज्यातील इतर तालुक्यांना घेण्यासारखा आहे. कोरोनात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झालेले आहे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण संस्थांकडून मोफत करण्याचा, शैक्षणिक संस्थांनी पालकांना फीचे समान हप्ते करून देण्याचा आणि गेल्यावर्षी ही सवलत दिली असताना ज्या पालकांनी अद्याप फी भरली नाही. त्यांनी ती त्वरित भरण्याचाही निर्णय या बैठकीत झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com