अजितदादांना महेशदादांचा फोन.. केशव घोळवे उपमहापैारपदी बिनविरोध  

महेशदादांनी अजितदादा पवार यांनाच फोन करून विनंती केली अन् या पदासाठीची निवडणूक न होता ती बिनविरोध झाली. त्यामुळे भाजपचे केशव घोळवे हे उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडून आले.
 अजितदादांना महेशदादांचा फोन.. केशव घोळवे उपमहापैारपदी बिनविरोध  
mahesh6.jpg

पिंपरी : उद्योगनगरीचे कारभारी भाजप आमदार महेशदादा लांडगे यांनी फोन केला अन् शहराच्या उपमहापौरपदाची निवडणूक आज बिनविरोध झाली. गेल्या चार वर्षात प्रथमच हे घडले. महेशदादांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उपमहापौर निवडणुकीतील एकमेव प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराचे नेते अजितदादा पवार यांनाच फोन करून विनंती केली अन् या पदासाठीची निवडणूक न होता ती बिनविरोध झाली. त्यामुळे भाजपचे केशव घोळवे हे उसतोड़ कामगाराचे पुत्र असलेले नगरसेवक उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडून आले.

घोळवे हे दादांच्या भोसरी मतदारसंघातील नाहीत. ते त्यांचे तसे समर्थकही नाहीत. घोळवे हे शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातील असून जुने भाजपचे कार्यक्रते आहेत. ते पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. तरीही महेशदादांनी त्यांच्यासाठी अजितदादांना विनंती करीत शब्द टाकला. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला. विधानसभा निवडणुकीपासून महेशदादांनी आपल्या कट्टर विरोधकांवरही थेट टिकाटिपण्णी न करता आदरयुक्त राजकारणाचा पायंडा सुरु केला आहे. तो गेले वर्षभर सुरुच आहे.

उपमहापौरपदाची आज पालिका मुख्यालयात निवडणूक होती. त्यासाठी अर्ज माघार घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत होती. पण, त्याअगोदरच महेशदादा हे स्वतः पालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांच्या कार्यालयात पोचले.

यावेळी माजी खासदार अमर साबळे हे ही त्यांच्याबरोबर होते. त्यांनी मिसाळ यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर व माजी विरोधी पक्षनेत्या मंगला कदम व इतरांना या निवडणुकीत सहकार्याची विनंती केली. मात्र, आमचे दादा म्हणतील ते असे त्यांनी महेशदादांना सांगितले. त्यावर महेशदादांनी थेट अजितदादांना फोन केला. त्यांच्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला, असे मिसाळ व कदम यांनी सांगितले. त्यांच्या उमेदवार निकिता कदम या नगरसेविका आहेत.  

हेही वाचा : उदयनराजे म्हणाले, "मराठा संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम.. 
 
सातारा :  "आरक्षणामुळे माणसे दूरावली जात आहेत. माझ्या मते आरक्षण हे गुणवत्तेनूसारच दिले पाहिजे," असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी काल (गुरुवार) येथे व्यक्त केले. सातारा पालिकेच्या उपाध्यक्षपदी मनोज शेंडे यांचीबिनविरोध झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे पालिका कार्यालयात आले. तेथे त्यांनी उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणासाठी विषयावर छेडले. त्यावर उदयनराजेंनी मी सर्वधर्म, जाती समाज समभाव मानतो. 

राज्यातील मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "मी मराठा म्हणून कधी मला संबोधले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मभावाची शिकवण दिली. तीच आजही अंमलात आणली आहे. माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत. लहानपणी गोट्या, विटया दांडू खेळायचो. तेव्हा तुम्ही पाहायचा का हा इथला तो तिथला. याआरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. कूठला हा दृष्टीकोन." 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in