कोल्हापूरनंतर आमदार महेश लांडगे कोकणच्या मदतीला

शनिवारी सायंकाळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार लांडगेंनी आवाहन करताच लगेच मदतीचा मोठा ओघ सुरु झाला आहे.
 Mahesh Landage .jpg
Mahesh Landage .jpg

पिंपरी : दोन वर्षापूर्वीच्या २०१९ मधील कोल्हापूरच्या महापूरात पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) हे यावेळी पुन्हा राज्यातील जलप्रलयात मदतीसाठी धावून गेले आहेत. आता त्यांनी आपला एक हात मदतीचा कोकणसाठी दिला आहे. आजच (ता. २५ जुलै) तातडीने चार हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे किट व एक हजार पाण्याचे जार ते रवाना करणार आहेत. पूरग्रस्तांकरिता शहरातील ही पहिलीच मदत आहे. (MLA Mahesh Landage's help to flood victims) 

दरम्यान, शनिवारी सायंकाळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार लांडगेंनी आवाहन करताच लगेच मदतीचा मोठा ओघ सुरु झाला आहे. रोख आणि वस्तूरुपात ती मिळू लागली आहे. २०१९ च्या महापूरात त्यांनी चाळीस ट्रक भरून नेमके व आवश्यक मदत साहित्य त्याची गरज असलेल्या ठिकाणी पोचवले होते. त्याजोडीने महापूराने पशुधन हिरावलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी लाखो रुपयांचे पशुधन स्वताः खर्चातून कोल्हापूरकरांसाठी दिले होते. कोल्हापूरच्या तालमीत पैलवानकीचे धडे त्यांनी गिरवले असल्याने त्यातून काही अंशी उतराई होण्यासाठी ते स्वतः ही मदत घेऊन तिकडे आपल्या दीडशे जणांच्या टीमसह गेले होते. त्यात मदत, बचाव व वैद्यकीय चमूही होता. तोच कित्ता त्यांनी यावेळी पुन्हा गिरवला आहे. फक्त ही मदत मोठा फटका बसलेल्या कोकणाला ते यावेळी देणार आहेत. 

फक्त संपर्का अभावी यावेळी कोकणात नेमकी काय व कुठे मदत पाहिजे हे समजत नसल्याने त्यांनी शहरातील कोकणवासियांची मदत घेतली आहे. त्यांनाच त्यांनी आवाहन करत आपापल्या गावाकडे कुठे व काय मदत पाहिजे हे विचारत त्यासाठी संपर्काचे आवाहन केले आहे. दरम्यान, दरड कोसळून मोठी हानी झालेले तळई आणि चिपळूणला त्यांनी मदतीसाठी प्राधान्य दिले आहे. आजपासून आणखी दोन दिवस ही मदत स्वीकारली जाणार आहे. त्यांच्या या मदतीच्या आवाहनाचे काल सायंकाळचे ट्विट शहरातील भाजपचे दुसरे आमदार व माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी लगेचच रिट्विट केले होते.

कोकणात आपण मोठ्या हौसेने फिरायला गेल्यावर तिथे आपले आदरातिथ्य अतिशय चांगले होते. मात्र, सध्या कोकणावरच वेळ आल्याने त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे, असे लांडगे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. आपले कोकण मोठ्या संकटात सापडले आहे. या आपल्या बांधवांना आणि परिसराला सावरण्यासाठी आता आपण पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अन्नधान्य, वस्तू किंवा आर्थिक स्वरुपात मदत केली पाहिजे. आपण पुढे येऊन कोकणातील बांधवांना मदत करूया, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याची सुरवात त्यांनी स्वतापासून करीत कोकणातील बचावकार्यासाठी एक रबर पोर्ट राज्य आपत्ती व्यवस्थापन संघाला लगेचच दिली आहे. तसेच पुन्हा एक हात मदतीचा या उपक्रमासाठी आपल्या कार्यालयात एक खास कक्ष उघडून तेथे कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीचा अनुभव असलेले आपले कार्यकर्ते तैनात केले आहेत. 
Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com