पक्षांतर्गत वादाला कंटाळून आमदार महेश लांडगेंचा भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा

लांडगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
पक्षांतर्गत वादाला कंटाळून आमदार महेश लांडगेंचा भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा
mahesh landge copy.jpg

पुणे : पिंपरी-चिंचवड भाजपमधील मतभेद दिवसेंदिवस विकोपाला जात असून आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचा गट, तसेच जुन्या नेत्यांचा वेगळेच म्हणणे यांच्यात ओढाताण होत असल्याने हे पदच आपल्याला नको, अशी भूमिका लांडगे यांनी घेतल्याचे समजते आहे.

लांडगे यांच्या राजीनाम्याच्या पवित्र्यानंतर त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतलू असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चर्चेसाठी बोलविले आहे. गुरूवारी, 27 आॅगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असताना हे मतभेद भाजपची डोकेदुखी वाढविणारे आहेत.

विविध विषयांवर जगताप यांच्याशी पटत नसल्यानेच लांडगे नाराज असल्याची चर्चा होती. त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात उमटत होते. कधी जगताप समर्थकांचा स्थायी समितीवर बहिष्कार तर सर्वसाधारण सभेतून लांडगे समर्थकांचा काढता पाय, असे प्रकार घडले. डॉक्‍टरांना नियमित करण्याच्या विषयाबाबत त्रुटी दूर करून निर्णय घेऊ आजच्या सभेत मंजुरी देऊ नये, असा आग्रह लांडगे समर्थकांचा होता.तर या विषयाला आजच मंजुरी द्यायची असा निर्णय चिंचवडकरांच्या आदेशाने महापौर आणि पक्षनेत्यांनी घेतला. हे निमित्त आजच्या राजीनाम्याला झाले. आजच्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. आपला विरोध असतानाही मंजुरी दिल्याच्या नाराजीतून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त महापालिकेत पसरले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in