प्राधिकरणाबाबतच्या महेश लांडगेंच्या त्या आवाहनास सर्वपक्षीय प्रतिसाद देणार का?

ही बाब शहराला परवडणारी नाही.
Mla Mahesh Landage Appealed  to All Political Parties to Come Together Against Decesion of State Cabinet to Amalgamation of Pcntda in Pmrda
Mla Mahesh Landage Appealed  to All Political Parties to Come Together Against Decesion of State Cabinet to Amalgamation of Pcntda in Pmrda

पिंपरी  ः पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (PCNTDA) वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन भोसरीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे (Mla Mahesh Landage ) यांनी आज (ता. १७ मे) केले. प्राधिकरणाचे पुणे महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणात (PMRDA) विलीनीकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतलेला निर्णय हा शहरावर अन्यायकारक असल्याने त्याविरोधात एकोप्याने लढूया, अशी साद त्यांनी घातली आहे. (Mla Mahesh Landage Appealed  to All Political Parties to Come Together Against Decesion of State Cabinet to Amalgamation of Pcntda in Pmrda)

राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठीच्या आवाहनाची पत्रे आमदार लांडगे यांनी शहरातील आमदार, माजी आमदार, महापौर, माजी महापौर, उपमहापौर, माजी उपमहापौर, सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, शहराध्यक्ष यासह सर्वपक्षीय नगरसेवक, गटनेते यांनाही पाठवली आहे. त्यात त्यांनी पीएमआरडीएची आर्थिक मरगळ झटकण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच पीएमआरडीएचा आवाका आणि व्याप पाहता ते पिंपरी-चिंचवडकरांना अपेक्षित असलेली विकासकामे गतीमानपणे करू शकणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. 

या पत्रात आमदार लांडगे म्हणतात, ‘‘पीएमआरडीएमध्ये प्राधिकरणाचे विलीनीकरण करून शहराचे तुकडे करण्यापेक्षा आशिया खंडातील सर्वांधिक श्रीमंत पिंपरी-चिंचवड या सक्षम पालिकेत ते वर्ग करणे अपेक्षित व योग्य होते. तत्कालीन भाजप सरकारने प्राधिकरण विलीनीकरणाचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी आपण सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी विरोधच केला होता. आता पुन्हा राजकीय मतभेद विसरून पिंपरी-चिंचवडकर म्हणून आपण एकत्रितपणे प्राधिकरण विलीनीकरणाला विरोध केला पाहिजे.’’ 

‘‘प्राधिकरणच्या सुमारे १ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी आणि कोट्यवधी रुपयांचे मोकळे भूखंड आहेत. शहरातील भूमिपुत्रांनी जमिनी दिल्यामुळेच प्राधिकरण स्थापन झाले आणि वाढले. आता प्राधिकरण विलीन झाल्यावर शहरातील संपत्ती, ठेवी पीएमआरडीएकडे वर्ग होणार आहेत. ही बाब शहराला परवडणारी नाही, त्यामुळे आपण सकारात्मक विचार करून पिंपरी- चिंचवडकर म्हणून एकोप्याने आणि सनदशीरपणे प्राधिकरण विलीनीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करू या,’’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, प्राधिकरण विलिनीकरणाला शहरातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल यांनी समर्थन दिले आहे. तर, आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्राधिकरण विलिनीकरणाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. त्याबद्दल त्यांचे आमदार लांडगे यांनी आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com