आमदार जगतापांनी गिरवला नीलेश लंकेंचा कित्ता : पिंपरी-चिंचवडमध्ये कोविड सेंटर सुरू केले

समाजाचे आपण काही तरी देणं लागतो.
MLA Laxman Jagtap started Kovid Center in Pimpri Chinchwad
MLA Laxman Jagtap started Kovid Center in Pimpri Chinchwad

पिंपरी  ः  मतदारसंघात कोरोना सेंटर उभारण्याचा पारनेरचे (जि. नगर) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचा कित्ता उद्योगनगरीतील चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे  आमदार लक्ष्मण जगताप यांनी गिरवला आहे. पन्नास बेडचे (त्यात वीस ऑक्सीजनचे) कोरोना सेंटर त्यांनी गुरुवारी  (ता. २२ एप्रिल) आपल्या मतदारसंघात सुरु केले. शहरातील लोकप्रतिनिधीने सुरु केलेले हे पहिलेच कोविड सेंटर आहे.

आमदार नीलेश लंके अकराशे बेडचे कोविड सेंटर सुरु करतात, तर त्यांच्यापेक्षा कितीतरी मातब्बर असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना ते का शक्य होत नाही, असा रोकडा सवाल पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी विचारला होता.

त्याबाबत 'आमदार निलेश लंके यांना जमते, ते मातब्बर लोकप्रतिनिधींना का जमू नये' या मथळ्याखाली नुकतेच (ता. १९) ‘सरकारनामाने’ वृत्त दिले होते. त्याची दखल पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी असलेले आमदार जगताप तसेच त्यांचे उद्योजक बंधू, माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी घेत चिंचवड मतदारसंघात पिंपळे गुरवमध्ये हे सेंटर आज सुरू केले आहे. 

आयुश्री हॉस्पिटलमध्ये या रुग्णालयाच्या सहकार्याने ते सुरु करण्यात आले आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक झाल्याने या रुग्णांना बेड मिळत नाहीत. त्यातून आणि समाजाचे आपण काही तरी देणं लागतो, त्यातून काहीअंशी उतराई होण्याच्या भावनेतून हे कोविड सेंटर उभारल्याचे शंकर जगताप यांनी ’सरकारनामा’ला हा उपक्रम सुरु करण्यामागील कारण विशद केले. कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी उचललेले हे पाऊल शहरातील इतर सर्व राजकारण्यांसमोर आदर्श निर्माण करणारे आहे, असेही ते म्हणाले.

शंकर जगताप म्हणाले, आमदार जगताप हे शहरातील नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी नेहमीच झटत असतात. त्यातूनच हा उपक्रम सुरु केला आहे. कारण गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने हे कोविड सेंटर कमी पडू लागली आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे सेंटर सुरू करण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com