मोठी बातमी : अखेर आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अटक  

आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात १२ मे रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती
 Anna Bansode, Siddharth Bansode .jpg
Anna Bansode, Siddharth Bansode .jpg

पिंपरी  : पिंपरीचे (Pimpri) राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) आमदार अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे (Siddharth Bansode) याला अखेर रत्नागिरीतून अटक केली आहे. तो खुनाच्या प्रयत्नांच्या दोन गुन्ह्यांत संशयित आरोपी असल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले होते. या आधी आमदारांच्या सात कार्यकर्त्यांना अटक केली आहे. (MLA Anna Bansode's son arrested)

आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात १२ मे रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. तत्पूर्वी सिद्धार्थ व त्याच्या साथीदारांनी हा गोळीबार करणारा पिंपरी चिंचवड शहरातील कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा व्यवस्थापक तानाजी पवार या माजी सैनिकाचे त्याच्या आकुर्डीतील कंपनीतून अपहरण केले होते. त्याला चिंचवड स्टेशन येथील आमदारांच्या कार्यालयात आणून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात सिद्धार्थ फरार होता. आज त्याला कोर्टा समोर हजर केले जाणार आहे.  

मारहाणीच्या वेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पवार याने दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यात कोणी जखमी झाले नव्हते. मात्र, आमदारांनी एक गोळी आपल्यावर झाडल्याचे सांगितले होते. तसेच, त्यांच्या कार्यकर्त्याने तशी तक्रार केल्याने पवारविरुद्धही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर, पवारच्या तक्रारीवरून सिद्धार्थसह आमदारांचे कार्यकर्ते यांच्याविरुद्ध अपहरण व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

दरम्यान, गोळीबाराच्या दिवशी सकाळी सिद्धार्थ बनसोडे व त्याच्या साथीदारांनी पवार याच्या कार्यालयात घुसून धुडगूस घातला होता. तेथील एका अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्लाही केला होता. त्याबाबत तेथील एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून आमदारांचे कार्यकर्ते व सिद्धार्थविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यात व पवार फिर्यादी असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत आमदारांच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंत आज सिद्धार्थ बनसोडे यालाही अटक करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com