असाही आदर्श...आधी वाचवला जीव अन् आता उचलणार शिक्षणाचा भार!  - Mayur Shelke felicitated by MP Shrirang Barne | Politics Marathi News - Sarkarnama

असाही आदर्श...आधी वाचवला जीव अन् आता उचलणार शिक्षणाचा भार! 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पॉइंट्समन म्हणून काम करणारा मयूर हा मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्याच्या नेरळ तलवडे गावचा रहिवासी आहे.

पिंपरी : प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून, रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव नुकताच वाचविलेल्या, मयूर शेळके या तरुणावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रेल्वे मंत्रालयाने मयूरच्या या शौर्याला सलाम ठोकत त्याला ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले. मयूरने बक्षिसाची अर्धी रक्कम त्याने वाचवलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी  देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेटिझन्सकडून पुन्हा एकदा मयूरच्या संवेदनशीलतेवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

तर या साठी मयूर शेकळेची राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार, असल्याचे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी सांगितले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पॉइंट्समन म्हणून काम करणारा मयूर हा मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्याच्या नेरळ तलवडे गावचा रहिवासी आहे. त्याचा खासदार बारणेंनी कर्जत तहसील कार्यालयात जाऊन गुरुवारी सत्कार केला. त्याच्या धाडसाचे, धैर्याचे कौतुक केले. त्याचे आई-वडील, कर्जत नगरपरिषद अध्यक्षा सुवर्णा जोशी, आमदार महेंद्र थोरवे, प्रांत वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख यावेळी उपस्थित होते.

नवे आदेश : कार्यालयांत १५ टक्के उपस्थिती, जिल्हा प्रवासावर मर्यादा, लग्न समारंभास दोन तासांची परवानगी

यावेळी खासदार बारणे म्हणाले, मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या फलाटावरून जाताना लहान मुलगा तोल जाऊन रेल्वे रुळावर पडला. त्यावेळी ट्रेन येत असल्याचे दिसताच मुलाचा अपघात होणार हे समजल्यावर क्षणाचा विलंब न लावता पॉइंटमन मयूरने तत्परतेने धाव घेतली. ट्रेन येण्याआधी काही सेकंद त्याने मुलाला वाचवले आणि स्वतः देखील प्लॅटफॉर्मवर चढला आपला जीव धोक्यात घालून मयूरने मुलाचा प्राण वाचविला. 

त्याच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मयूरचा  सर्वांना अभिमान आहे. त्याचे मी कौतुक करतो. शेळके परिवाराचेही अभिनंदन करतो. त्याचे हे कार्य, विचार आपल्यासाठी आणि समाजासाठी प्रेरणादायक आहेत. त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. म्हणून त्याची राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मी शिफारस करणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.

सोलापूरच्या पालकमंत्र्यांचा बोलण्यातील गोडवा कामात दिसेना!
 

दरम्यान, मयुरच्या शौर्याची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतली होती. मयुर शेळकेला फोन करुन उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. मुख्यमंत्री म्हणाले होते की ''तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचे काम केलेत तुम्ही'' अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली होती.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख