...अन्यथा लॉकडाउन करावा लागेल 

लग्न अथवा इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक संख्या आढळल्यास आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आज दिला.
Mayor of Pimpri Chinchwad warned to lockdown
Mayor of Pimpri Chinchwad warned to lockdown

पिंपरी : कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी अनावश्‍यक गर्दी करून नियमांचे उल्लंघन करू नये; अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी मंगळवारी (ता. 16 मार्च) दिला. दरम्यान, शंभराच्या आत आलेली शहरातील दररोजची कोरोना रुग्णसंख्या आज 894 वर गेली, तर पाच जणांचा बळी गेला आहे. 

लग्न अथवा इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक संख्या आढळल्यास आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आज दिला. सूचना देऊनही अनावश्‍यक गर्दी होत असलेल्या परिसरात कलम 144 लागू (जमावबंदी) करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

कोरोना नियंत्रण उपाययोजनांचा सर्वंकष आढावा तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांच्या व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत महापौर व आयुक्त बोलत होते. कोरोनाने पुन्हा जोरदार उचल खाल्याने प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेऊन हा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी या वेळी केले. 

या वेळी सभागृहाचे नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, शिवसेनेचे राहुल कलाटे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि झोनल रुग्णालयांचे सर्व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक, भाजी मार्केट अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलावीत, असा आदेश महापौरांनी या वेळी प्रशासनाला दिला. भरारी पथकाद्वारे तपासणी मोहिम अधिक गतीमान करावी. नागरिकांना लसीकरणासाठी घरापासून दूर जावे लागणार नाही, यासाठी दाट लोकवस्तीच्या भौगोलिक रचनेनुसार लसीकरण केंद्राची उभारणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. 

कोरोना रुग्णांना उपचारासाठी कसलीही अडचण भासणार नाही, याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी. लसीकरण केंद्रात पुरेसे मनुष्यबळ असावे, अशा सूचना ढाके यांनी केल्या. नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे, असे मिसाळ यांनी सुचविले. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाय योजनांवर भर दिला जात असून महापालिका रुग्णालये सर्व सुविधांनी अद्यायवत असावे यासाठी महापालिका प्रशासन काम करीत आहे, असे आयुक्तांनी सांगितले. रूग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देत असले, तरी बेड मॅनेजमेंट चांगले होण्यासाठी प्रशासनाने महापालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालये यांचा आराखडा तयार केला आहे. महापालिका रूग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा आणि मनुष्यबळ याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. लसीकरण केंद्रांची उभारणी शहरातील विविध भागात केली जात असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केंद्राचे योग्य ठिकाण निवडून तेथे केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना विषयक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com