राम मंदिरासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराकडून दहा लाखाची देणगी..

श्रीराम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दहा लाख रुपयांची देणगी दिली.
राम मंदिरासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराकडून  दहा लाखाची देणगी..
shelke24.jpg

पिंपरी : अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दहा लाख रुपयांची देणगी काल (ता.२३) दिली. मावळातील प्रत्येकाने या अभियानात सहभागी होऊन राममंदिर निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शेळके यांनी मावळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मावळवासियांना केले आहे.  

सर्व पक्ष मिळून एक कोटी रुपयांचा निधी या मंदिर उभारणीसाठी तालुक्यातून गोळा करण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देणगीचा धनादेश त्यांनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे जिल्हा संयोजक प्रदीप शामराव देसाई यांच्याकडे  शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे सुपूर्त केला. त्यानंतर सियावर रामचंद्र की जय असा उस्फूर्त जयजयकार करण्यात आला. या देणगीबद्दल आनंद व्यक्त करू सर्वांनी शेळके यांना फॉलो करावे, असे देसाई म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, विश्व हिंदू परिषद कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, सहसंयोजक निधी अभियान संतोषभाऊ भेगडे पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा निधीप्रमुख रमेश लोणकर, अध्यक्ष बजरंग दल मावळ गोपीचंद महाराज कचरे, बजरंग दल संयोजक संदेश भेगडे, जिल्हा मंत्री अमित भेगडे, महेंद्र असवले, अमोल पगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्याकरीता एवढा वैयक्तिक निधी देणारे शेळके हे राज्यातील पहिले आमदार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
 
हेही वाचा : सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच घडवली.. 
लखनऊ:  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानला जाताना विमान दुर्घटनेत झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूवरून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येतात. केंद्र सरकारने 2017मध्ये आरटीआयच्या माहिती अधिकाऱ्यातून दिलेल्या माहितीनुसार सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला आहे. पण सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसने केली असा गंभीर आरोप भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केला आहे. साक्षी महाराजांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in