लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रेल्वे वाहतूक ठप्प - Major damage due to heavy rains in Lonavla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रेल्वे वाहतूक ठप्प

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून काही ठिकाणी शेती पिके वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोणावळा : मुंबईसह ( Mumbai) राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसाणुळे अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा (heavy rains in Lonavla) दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. (Major damage due to heavy rains in Lonavla) 
 
लोणावळा खंडाळा येथे देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून तीन तासात 150 ते 175 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून काही ठिकाणी शेती पिके वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत.

देखमुखांनी भाजपसाठी जे केले: ते भरणे राष्ट्रवादीसाठी करुन दाखवतील काय?

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही जोर धरला आहे. मुंबईत पावसाची कोसळधार कायम असून, अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर दुसरीकडे संततधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे रेल्वे रुळांचे प्रचंड नुकसान झाले असून रुळांवर कमरेइतके पाणी साचले आहे. 

हेही वाचा : यशस्वी मुख्यमंत्री अन् सक्षम विरोधी पक्षनेता...

दरड कोसळल्यामुळे टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा या दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंबरनाथ ते सीएसएमटीची रेल्वे वाहतूक सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हवामान विभाने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र नंतर रेड अलर्ट देण्यात आला. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील अनेक ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख