भाजप आमदार महेश लांडगेंचा आंदोलनाचा सर्वधर्मसमभाव ! 

आमदार महेश लांडगे यांनी शहरात एकूण सहा ठिकाणी आंदोलन केले.
Mahesh Landage went to the prayer place of all religions and started an agitation
Mahesh Landage went to the prayer place of all religions and started an agitation

पुणे : राज्यातील मंदिरं खुली करावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 13 ऑक्‍टोबर) राज्यभरात आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यात त्यांनी शहरातील सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळी जाऊन आंदोलन करत ती खुली करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली देशातील मंदिरे, श्रद्धास्थळे आणि प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला. पण, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप मंदिरे खुली केलेली नाहीत. 

राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर बार सुरू झाले. पण, सरकारला मंदिरं खुली करताना काळजी वाटत आहे. त्याच्या निषेधार्थ भाजप आणि सहयोगी संस्था-संघटनांच्या वतीने "मंदिरं बंद, बार उघडले, उद्धवा धुंद तुझे सरकार' असा घणाघात करीत राज्यभरात निदर्शने करण्यात आली. 

दरम्यान, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी शहरात एकूण सहा ठिकाणी आंदोलन केले. राज्यात केवळ मंदिरं खुली करण्याबाबत आंदोलन झाले आहे. पण, आमदार लांडगे यांनी शहरातील प्रार्थना स्थळे खुली करावीत, अशी मागणी केली. 

लांडगे यांनी दिघीतील गुरुद्वारा, दिघीच्या डोळस वस्ती येथील बुद्ध विहार, चऱ्होली येथील थोरल्या पादुका मंदिर आणि वाघेश्वर मंदिर, भोसरीतील मारुती मंदिर, दिघी येथील भैरवनाथ मंदिर, चऱ्होली येथील बुद्ध विहार, मोशीतील नागेश्वर मंदिर, तळवडे येथील मिनार मशिद, मांगीरबाब मंदिर, तावकुल्ल जामा मशिद यांसह चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिर आदी ठिकाणी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मंदिरं, प्रार्थनास्थळं खुली करा, अशी मागणी करीत आंदोलन केले. 

या आंदोलनामध्ये वारकरी संप्रदायापासून बौद्ध, शिख, मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते. शहरातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना, सर्व स्तरातील घटकांना सोबत घेवून आमदार लांडगे यांनी आंदोलन केले. 

मंदिरांसह गुरूद्वारा, मशिदी, चर्चही खुली करण्याची मागणी 

देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये वारकरी सांप्रदाय मोठा आहे. मंदिरं खुली करण्यासाठी केलेल्या उपोषणाला वारकरी सांप्रदयातील कीर्तनकार, प्रबोधनकार आवर्जुन सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई आपस में है भाई-भाई, असा संदेश देत आमदार लांडगे यांनी मंदिरांसह गुरुद्वारा, मशिदी, चर्च आदी प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी केली. त्यामुळे आंदोलनाला सर्वसमावेशक स्वरुप प्राप्त झाले होते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com