आम्हालाही विनामास्क मोटारीतून फिरू द्या 

मुंबई, पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधील कुटुंबांनाही आपल्या मोटारीतून विनामास्क फिरण्याची परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
Let us ride in the car without a mask jpg
Let us ride in the car without a mask jpg

पिंपरी : मुंबई, पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधील कुटुंबांनाही आपल्या मोटारीतून विनामास्क फिरण्याची परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण ती देण्याची मागणी खुद्द महापौर माई ढोरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे काल केली आहे.

दरम्यान, मिशन बिगीनअंतर्गत शाळानंतर आता शहरातील क्लासेसही (नववीपासून पुढील)झाले आहेत. या खासगी शिकवणी वर्गासह प्रशिक्षण संस्था, टायपिंग व संगणक संस्था, खासगी व सरकारी वाचनालये, अभ्यासिका सामाजिक अंतर राखून व सॅनिटायझरचा वापर करीत सुरु करण्यास आय़ुक्तांनी काल परवानगी दिली. 

त्यामुळे शाळा न उघडल्याने अभ्यास न झालेल्या व त्यासाठी क्लास लावलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांच्या परिक्षांच्या तारखाही कालच जाहीर झाल्याने त्यांना अभ्यासाची आता कसरत पुढील तीन महिन्यात करावी लागणार आहे.

कोरोनाचा प्रार्दूभाव कमी झाल्याने मिशन बिगीनचा पुढील टप्पा म्हणून मुंबई महापालिकेने प्रथम कुटुंबाना आपल्या मोटारीतून विनामास्क फिरण्यास परवानगी दिली. त्याचा कित्ता पुणे पालिकेने गिरवला. गेल्या शुक्रवारपासून आयुक्तांनी ही संमती पुण्यात दिली. त्यामुळे आता पिंपरीच्या आय़ुक्तांवर त्यासाठीचा दबाव वाढला आहे. 

शहरातील नागरिकांनीही आपल्या कुटुंबासह आपल्या मोटारीतून मास्कशिवाय फिरण्याची परवानगी देण्याची विनंती महापौरांकडे केली. त्यामुळे महापौरांनी या मागणीला परवानगी देण्याचे पत्र काल आयुक्तांना दिले. खाजगी चारचाकी वाहनातून कुटुंबासमवेत प्रत्यक्ष प्रवास करत असताना मास्क घालण्यावरील बंधन उठवून पुणे शहराप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांना दिलासा देणेबाबत आपणांकडून संबंधितांस योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश व्हावेत, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com