मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने शिवसेना सोडली

. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे, पण..
Sarkarnama Banner - 2021-08-12T133855.391.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-12T133855.391.jpg

पिंपरीः ''माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचा टॅटू आपल्या हातावर काढल्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र,एखाद्या चांगल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करावं असं वाटत होतं. पण, माझं प्रेम,जरा जास्त वाढलं आणि मी हातावर फडणवीसांचा टॅटू काढला,'' असे स्पष्टीकरण त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दिले. माथाडी कामगारांसाठी सत्तेत असू वा नसू फडणवीस हे काम करीत असल्याने त्यांचे नाव हातावर गोंदवून घेतल्याचा खुलासा त्यांनी यावेळी प्रथमच केला.

फडणवीसांचा टॅटू गोंदवून घेण्याच्या वेदना झाल्या नाहीत, असेही राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस असलेले पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. फडणवीसांचे त्यांची तोंडभरून कौतूक केले. कॉंग्रेसचा मुख्यमंत्री असताना मला जो आधार मिळाला नाही, तो मुख्यमंत्री फडणवीसांनी मी राष्ट्रवादीचा आमदार असूनही दिला होता. ते आजही मदत करतात, असे ते म्हणाले. गेल्या लोकसभेला मी साताऱ्यातून भाजपकडून लढावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, शिवसेना ही जागा सोडायला तयार नव्हती. म्हणून मला शिवसेनेत Shiv Sena जावे लागले होते, अशी त्यावेळची मजबुरी त्यांनी सांगितली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न  झाल्याने शिवसेना सोडल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

कॉग्रेस टि्वटरच्या विरोधात आक्रमक ; फेसबूकवरुन दिलं उत्तर
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्य़े माथाडींच्या कामात कंत्राटी पद्धत आणि गुंडगिरी घुसल्याबद्दल पाटील यांनी खेद व संतापही व्यक्त केला. ही बाब पोलिस आयुक्तांपासून ते थेट शरद पवारांपर्यंत सर्वांच्या कानी घातली असल्याचे त्यांनी सांगितले. माथाडी कामगार कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे औद्योगिक पट्ट्यासह सातारा एमआयडीसीत बरेचशे कारखानदार माथाडी कामगार कायद्याचे उल्लंघन करतात. या विषयी कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड आणि पोलिस प्रशासनाला वारंवार कळवूनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. काही स्वंयघोषित माथाडी कामगारनेते आपली पत्नी, मुलांच्या नावे कंत्राटे घेऊन स्वताचीच घरे भरतात आणि माथाडी कामगारांना देशोधडीला लावतात, अशी सल त्यांनी बोलून दाखवली. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या आपल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत २७ हजार मराठा युवक उद्योजक झाले. तसेच भ्रष्टाचार नसलेले व दिशा देणारे हे एकमेव महामंडळ त्यावेळी होते,असा दावा त्यांनी केला.  
 Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com