स्वबळ स्वबळ करणाऱ्या महाआघाडीला जनताच पळ काढायला लावेल - Leader of Opposition Pravin Darekar criticizes leaders of Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

स्वबळ स्वबळ करणाऱ्या महाआघाडीला जनताच पळ काढायला लावेल

भाऊ म्हाळसकर
बुधवार, 14 जुलै 2021

सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे.

लोणावळा : कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना स्वबळाचे पडले आहे. पण, महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हातात ताकद राहिलेली नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या बाहुत बळ राहिले नाही. आज राज्यातील कामगार देशोधडीला लागलाय. त्या कामगारांच्या हातात बळ राहिलेले नाही. बेरोजरांना रोजगार मिळत नाही, पण अशा वेळी सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे. परंतु जर अशाच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसाल तर स्वबळ स्वबळ करता करता ही जनताच त्यांना पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा जोरदार टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. (Leader of Opposition Pravin Darekar criticizes leaders of Mahavikas Aghadi)

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता. १४ जुलै) लोणावळा येथील शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी चिटणीस रमेश पाळेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच विविध वेतनवाढ करार स्वाक्षरी कार्यक्रम दरेकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सर्वश्री विजय पाळेकर, बिंदरा गणतंत्रा, अॅड. राहुल पोळ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. 

हेही वाचा : सोलापूरचे कारभारी होण्यासाठी दोन मामांमध्ये चढाओढ!

दरेकर म्हणाले की, कॉंग्रे़सचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील याच ठिकाणावरून स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य केले व महाविकास आघाडीतील अविश्वासाचे वातावरण व विसंवाद जनतेसमोर उघड झाला.

महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. शेतक-यांना वेळेत पीकविमा मिळात नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झालाय, बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तो युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे तुमच्या स्वबळाचं राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार यांना काही देणं-घेणं नाही. फक्त आमच्या हातात बळ कधी येणार? आमचं कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता आशेने बघत आहे. पण या महाविकास आघाडी सरकारला त्याचं काही पडलेलं नाही, असे दरेकर म्हणाले. 

राज्यातील कोट्यवधी जनतेचा विकास करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधील सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता जास्त आहे. सत्ता कशी टिकून राहील, याची काळजी त्यांना जास्त आहे. आधी एकमेकांना शिव्या घालायच्या व दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र नांदायचे, हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे समीकरण झाले आहे असेही दरकेर यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख