लक्ष्मण जगताप, महेश लांडगेंच्या मतदारसंघात कोरोनाचे रुग्ण अधिक 

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा कंन्टेटमेंट झोन जाहीर करण्यास सुरूवात झाली आहे.
Laxman Jagtap, Mahesh Landage's constituency has more corona patients
Laxman Jagtap, Mahesh Landage's constituency has more corona patients

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 16 टक्के कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण आठ दिवसांत 25 टक्‍यावर जाणे ही काळजी करण्यासारखी स्थिती असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज सांगितले. प्रत्येकजण जबाबदारीने वागला, तर कोरोना आटोक्‍यात येईल व लॉकडाऊन करावा लागणार नाही, असेही ते म्हणाले. स्वःताची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

दरम्यान, शहराचे कारभारी असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या अनुक्रमे भोसरी व चिंचवड मतदारसंघातच दुसऱ्या टप्यातील कोरोना अधिक असल्याचे महानगरपालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा कंन्टेटमेंट झोन जाहीर करण्यास सुरूवात झाली आहे. असे 19 झोन गेल्या तीन दिवसांत जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यात एक सोसायटीचा समावेश असून तेथे 11 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 

कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे प्रशासनाने कारवाई काहीशी तीव्र केली असून 18 हॉटेलांना 45 हजार रुपयांचा दंड केला आहे. भविष्यात दंडाऐवजी हॉटेल सील केले जाणार आहे. विनामास्क फिरणारे व रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंड करण्यासाठी आता प्रभागनिहाय भरारी पथकेच तयार करण्यात आली आहेत. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 1 कोटी 64 लाख रुपये, तर रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून 8 लाख 21 हजार रुपयांचा दंड पालिकेने आतापर्यंत वसूल केला आहे. 

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील दररोजची रुग्णसंख्या ही शंभराच्या आत येऊन मृत्यूचा आकडा शून्य झाला होता. पण, आजची रुग्णसंख्या 453 वर पोचली आहे. कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. गर्दीत जात असलेल्या तरुणवर्गाला कोरोना होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ही स्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असले, तरी ती नियंत्रणात येण्यासाठी नागरिकांचे सहकार्य खूप महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com