लक्ष्मण जगताप गटाचा महेश लांडगे समर्थकांना अल्टिमेटम  - Laxman Jagtap group's ultimatum to Mahesh Landage supporters | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

लक्ष्मण जगताप गटाचा महेश लांडगे समर्थकांना अल्टिमेटम 

उत्तम कुटे 
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

त्या सभेत भाऊ समर्थकांनी राडा केला होता.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी आणि भोसरीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेल्या स्थायी समिती अध्यक्षांनी आजची सभाही तहकूब केल्याने संतापलेल्या भाऊ समर्थक (चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप) सदस्यांनी अध्यक्षांसह प्रशासनालाही आता अल्टिमेटम दिला. दरम्यान, स्थायी समितीची सभा तहकूब होण्याची आठवडाभरात हॅट्‌ट्रीक झाली आहे. 

सभा स्थगितीच्या सत्रांमुळे ऐन सणासुदीत शहरवासियांचे ज्वलंत प्रश्न कसे व कुठे मांडायचे, अशी संतप्त विचारणा उपस्थित भाऊ समर्थक सदस्यांनी केली. मागील आठवड्याची बुधवारची स्थायी समितीची साप्ताहिक बैठक तहकूब झाली होती. तर, या आठवड्याची सभाही कोरम नसल्याचे कारण देऊन परवा आजपर्यंत स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे त्या सभेत भाऊ समर्थकांनी राडा केला होता. पाण्याचा काचेचा ग्लास त्यावेळी भिरकारवून देण्यात आल्याने तो फुटला होता. आज, अध्यक्ष संतोष लोंढे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सभा तहकुबीसाठी दिले. 

बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली असून त्याबाबत काहीच उत्तर न आल्याने आजची सभा येत्या बुधवारपर्यंत तहकूब करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, शशिकांत कदम या भाऊ समर्थकांचा संताप झाला. बारणे यांनी सभा घेण्यासाठी बुधवार हा अल्टिमेटम असल्याचा इशारा दिला. 

जनतेचे प्रश्न कसे मांडायचे, अशी विचारणा त्यांनी केली. आयुक्तांसह अधिकारीही उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पुढील बैठकीला ते हजर पाहिजेत, असे ते म्हणाले. दादा समर्थक अध्यक्ष वगळता दादांचे इतर समर्थक सदस्य या ऑनलाइनही सभेला हजर नव्हते. आयुक्त श्रावण हर्डीकर हे महापालिकेत असूनही त्यांनी सभेकडे पाठ फिरवली. इतर फक्त दोन अधिकारी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख