कृष्णप्रकाश यांनी वाढदिवशी जनतेकडे मागितली ही भेट.... 

वाढदिवशीही केक, पुष्पगुच्छ वा भेटवस्तूऐवजी त्यांना पुस्तके भेट दिली, तर अधिक आनंद होतो.
कृष्णप्रकाश यांनी वाढदिवशी जनतेकडे मागितली ही भेट.... 
Krishnaprakash .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यावर्षीही आपल्या वाढदिवशी ( ता. १५ ) पुष्पगुच्छ, हारतुरे, केक वा इतर भेटी स्वीकारणार नाहीत. तर, त्याऐवजी प्रेरणादायी पुस्तके भेट म्हणून द्या, आनंद वाटेल, असे आवाहन त्यांनी केले आहे. जमा झालेली ही पुस्तके ते पूरग्रस्त भागातील ग्रंथालयांना देणार आहेत. याअगोदरही पूरग्रस्त भागातील मदतीत त्यांनी आपला खारीचा वाटा उचललेला आहे. (Kushnaprakash will give books to the flood affected area) 

गतवर्षी ५ सप्टेंबर रोजी पिंपरीचे आयुक्त म्हणून पदभार हाती घेताच नंतरची दिवाळी त्यांनी अनाथ मुलासमवेत साजरी केली होती. तसेच वाढदिवशीही केक, पुष्पगुच्छ वा भेटवस्तूऐवजी त्यांना पुस्तके भेट दिली, तर अधिक आनंद होतो. तोच पायंडा पुढे चालू ठेवत यावर्षीही ते तरुणांना प्रेरणा देतील, ठरतील अशी पुस्तके ते भेट घेणार आहेत. इतर भेटवस्तू देणे आवर्जून टाळावे, असे आवाहन त्यांनी यानिमित्त केले आहे. ही पुस्तके ते पूरग्रस्त भागातील ग्रंथालयांना देणार आहेत.  

स्वत: कृष्णप्रकाश यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. ती त्यांच्या बोलण्यातून दिसूनही येते. त्यातही हिंदीत, तर शाहिरी अंदाजातील त्यांचे बोलणे ऐकतच रहावे, असे वाटते. सोशल मिडियावर अत्यंत सक्रिय असलेल्या त्यांच्या अनेक पोस्टमधूनही त्यांच्या वाचनाचा, अभ्यासाचा प्रत्यय येत असतो. त्यांच्या टेबलवरही पुस्तकांचीच गर्दी असते. वाचनासह त्यांच्या फिटनेस फंड्यामुळेही तरुणाईत त्यांची मोठी क्रेझ आहे. अत्यंत अवघड अशी जागतिक स्तरावरची स्पर्धा पूर्ण करून त्यांनी अल्ट्रामॅन हा किताब पटकावलेला आहे. तो मिळवणारे देशाच्या नागरी सेवेतील ते पहिले अधिकारी आहेत. 

आपल्या या फिटनेसचे तरुणांनी अनुकरण करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी वाचनातून प्रेरणा घ्यावी, यासाठीही त्यांची धडपड त्यांच्यापरीने सुरु असते. म्हणून आपल्या वाढदिवशीही अशीच प्रेरणादायी पुस्तके आपल्याला भेट द्यावी, मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे इतर भेटवस्तू टाळून तरुणांना उपयोगी पडतील व कायमस्वरुपी राहतील अशी पुस्तके भेट म्हणून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, कृष्णप्रकाशांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे तीन दिवसांपासून राज्यातून नाही, तर देशभरातून त्यांच्या अभिष्टचिंतनास सुरवातही झाली आहे. अनेकजण प्रत्यक्ष भेटूनही गेले आहेत.   

Edited By - Amol Jaybhaye 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in